IPL 2023 : आयपीएलच्या 16 (IPL 2023) व्या हंगामात काल (8 एप्रिल 2023) मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघातील सामना वानखेडे स्टेडियमवर झाला. या दोन्ही टीम्सची पहिलीच मॅच होती. या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्जने बाजी मारली. मात्र या मॅचदरम्यान महाराष्ट्राची हास्यजत्रची हवा आयपीएलच्या मैदानात पाहायला मिळाली. महाराष्ट्राची जत्रा हा शो महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पोहोचला आहे. या शोमधील अनेक फॉरमॅट असे आहेत ज्यांना तुफान लोकप्रियता मिळवली. अवली लवली कोहली हा फॉरमॅट त्यापैकीच एक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'महाराष्ट्राची हस्यजात्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाने टीव्हीप्रेमींमध्ये मोठी क्रेझ निर्माण केली आहे.  हे मराठी टेलिव्हिजन पाहणाऱ्या प्रत्येकाला माहीत आहे. हास्यजत्रेतील कोहली फॅमिली म्हणजेच नम्रता संभेराव, शिवाली परब, प्रियदर्शनी इंदलकर आणि प्रसाद खांडेकर यांचे 'आवली लव्हली कोहली' हे कॉमेडी स्किट खूप गाजले. या स्किटला इतकी लोकप्रियता मिळाली की, एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने त्यावर रील बनवली. ही रील सोशल मीडियावरही व्हायरल प्रचंड झाली. त्यातच आता हास्यजत्रेतील अवली लवलीची मुंबई इंडियन्सला ही भुरळ पडलेली दिसते. या व्हिडीओवर चक्क मुंबई इंडियन्सच्या एका लोकप्रिय खेळाडूने गाण्यावर रील बनवले आहे.


वाचा : सुट्टीच्या दिवशी घराबाहेर पडण्यापूर्वी वाचा ही महत्त्वाची बातमी


मुंबई इंडियन्समधील (Mumbai Indian) ऑस्ट्रेलियन खेळाडू रिले मेरेडिथने कोहली फॅमिली लिव्हरचा एक विनोदी व्हिडिओ बनवला आहे.  या व्हिडीओमध्ये तो शेवट “मी रायली आवली कोहली” मुंबई इंडियन्सच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून रायली मेरेडिथचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्याच्या या व्हिडीओवर नम्रता संभेरावणे कमेंट केली.



रिले मेरेडिथचा कोहलीच्या फॅमिलीचा व्हिडिओ पाहून  नम्रताला हसू अनावर झालं आहे. या व्हिडिओवर तिने हसण्याचे व हार्ट इमोजी कंमेटं मध्ये दिले आहेत. रैलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायलर झाला असून चाहत्यांनी प्रचंड पसंती दिली आहे.