रायगड : शिवजयंतीचा सोहळा राज्यात मोठ्या जोशात, उत्साहात सुरु असताना या सोहळ्याला गालबोट लागले आहे. शिवजन्म सोहळा साजरा करण्यासाठी रायगडावर येणाऱ्या तीन जणांना अपघात झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाड आणि भोर दरम्यान वरंध घाटातील कावळागड येथे ही घटना घडलीय. भोर येथील तीन तरुण शिवज्योत घेण्यासाठी रायगडाकडे निघाले होते. ते तिघे वरंध घाट आले असता त्यांचे मोटार सायकलवरील नियंत्रण सुटले आणि ते तिघेही मोटर सायकलसह दरीत कोसळले.


महाड एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरीत कोसळलेल्या दोन तरुणांना दोघांना बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. मात्र, तिसऱ्या तरुणाचा अद्याप शोध सुरु आहे.