मुंबई : देशभरात 5G सेवा लॉंच झाली आहे. या लॉंचिंगनंतर देशभरातील प्रमुख 13 शहरांमध्ये नागरीकांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. परंतु यासाठी तुमचा फोन 5G असणे आवश्यक आहे. यामुळे 4G स्मार्टफोन (Smartphone) धारकांची पंचाईत झाली आहे. अशा 4G स्मार्टफोन धारकांनी 5G सेवा कशी अॅक्टीवेट (Activate) करावी हे जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 1 ऑक्टोबर रोजी 5G सेवा लॉंच केली. पहिल्या टप्प्यात देशातील सर्व महानगरांसह 13 शहरांमध्ये लोकांना या सेवेचा आनंद घेता येणार आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, चंदीगड, गुरुग्राम, हैदराबाद, लखनौ, पुणे, गांधीनगर, अहमदाबाद आणि जामनगरचा समावेश आहे, परंतु यासाठी तुमचा फोन 5G असणे आवश्यक आहे. 


सध्या दोन प्रकारचे लोक आहेत, पहिला ज्यांच्याकडे पैसे आहेत आणि ते लगेच नवीन 5G स्मार्टफोन (Smartphone) खरेदी करून  या सेवेचा लाभ घेऊ शकतात. तर दुसरे सध्या मोबाईल बदलण्याच्या स्थितीत नाहीत, परंतु त्यांना 5G सेवा वापरायची आहे. सध्या अनेक स्मार्टफोन (Smartphone) आहेत, ज्यामध्ये 5G सेवा सहज अॅक्टीवेट केली जाऊ शकते. 


एअरटेलकडून 'या' शहरात सेवा सुरु
1 ऑक्टोबरपासून एअरटेलची 5G (Airtel 5G) सेवा निवडक शहरांमध्ये उपलब्ध झाली आहे. एअरटेलने सध्या दिल्ली, वाराणसी, बेंगळुरू, हैदराबाद, मुंबई, चेन्नई आणि सिलीगुडी येथे 5G सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. मात्र, कंपनीने नेमके ठिकाण किंवा प्रदेश कुठे या सेवा उपलब्ध होतील हे सांगितलेले नाही.


5G सेवा कशी अ‍ॅक्टीवेट कराल? 


  • तुमच्या स्मार्टफोनवर (Smartphone) सेटिंग्ज अ‍ॅप उघडा

  • कनेक्शनमध्ये जा किंवा मोबाइल नेटवर्क पर्याय पहा

  • नेटवर्क मोडवर टॅप करा आणि 5G/4G/3G/2G पर्याय निवडा

  • नेटवर्क मोड 5G वर सेट केल्यावर, तुम्ही 5G-सक्रिय क्षेत्रात असाल तर, स्मार्टफोन आपोआप 5G लोगो दाखवण्यास सुरुवात करेल.

  • या सेटींगनंतर तुमचा सध्याचा स्मार्टफोन 5G सेवेत सुरू होईल


5G सेवा वापरू शकाल 'हे' कसे जाणून घ्यावे?


  •  Airtel Thanks अ‍ॅप वापरून तुमच्या सध्याच्या स्मार्टफोनसाठी 5G कंपॅटिबिलिटी तपासली जाऊ शकते.

  •  तुम्ही 5G सेवा उपलब्ध असलेल्या भागात राहिल्यास, तुम्ही चांगल्या स्पीड इंटरनेटचा लाभ घेऊ शकता.


सिम बदलण्याची गरज आहे का?
5G सेवेसाठी 5G स्मार्टफोन (Smartphone) वापरणे गरजेचे आहे, अशी माहिती आहे. मात्र तुमच्या सध्याच्या 4G सिमवर 5G सेवा सुरू होईल. त्यामुळे तुम्हाला सिम (SIM card) बदलण्याची गरज नाही.


दरम्यान सध्या अनेक टेलिकॉम कंपन्यांनी (Telecom Compani) 5G सेवा सुरु करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ग्राहकांचा 5G सेवेकडे कल वाढला आहे.