Uddhav Thackeray On PM Modi With Refrance To Balasaheb: महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी कणकवलीमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेमध्ये आपल्या खास शैलीत भाषण करताना उद्धव ठाकरेंनी या मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नारायण राणेंवर कठोर शब्दांमध्ये टीका केली. मात्र याचबरोबर उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या विधानांवरुनची त्यांच्यावर टीका केली. भाषणामध्ये राम मंदिराचा उल्लेख केल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंचा संदर्भ देत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना बाळासाहेब ठाकरे तुमच्या वर्गात होते का? असा खोचक सवाल विचारला. उद्धव ठाकरे असं का म्हणाले जाणून घेऊयात.


बाबासाहेबांनी आंदोलन केले तेव्हा...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपावर निशाणा साधताना उद्धव ठाकरेंनी राम मंदिरं बांधलं हे चांगलं केल की वाईट? याचं उद्धव यांनी उत्तर द्यावं या टीकेवर भाष्य केलं. राम मंदिर बांधलं हे चांगलच केलं. पण राम मंदिराबद्दल बोलण्याची तुम्हाला हिंमत होत नव्हती तेव्हा शिवसेनेनं पुढाकार घेतला. आम्ही राम मंदिराला पाठिंबा दिला, असं उद्धव ठाकरे म्हणाले. दोन वेळा तिथं जाऊनही आलो, असं उद्धव राम मंदिराबद्दल म्हटलं. तसेच त्यांनी अमित शाहांवर निशाणा साधला. "मी तेथे (राम मंदिरात) दोन वेळा जाऊनही आलो. पण तुम्ही भवानी मातेच्या मंदिरात का गेला नाही, याचं उत्तर द्या. तुम्ही राज्यघटना बदलायला निघाला आहात, त्या घटनेचे शिल्पकार डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दलितांना प्रवेशासाठी आंदोलन केले. म्हणून 22 जानेवारीला आम्ही त्या मंदिरात गेलेलो. पण बाबासाहेबांनी आंदोलन केले तेव्हा तुमचे बुरसटलेले गोमूत्रधारी विरोध करत होते," असा टोला उद्धव यांनी लगावला. 


नक्की वाचा >> 'ये आडवा, तुला गाडूनच...', ठाकरेंचं राणेंना चॅलेंज; म्हणाले, 'लाज वाटली पाहिजे, 2-3 वेळा..'


बाळासाहेब तुमच्या वर्गात होते का?


पुढे बोलताना उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बाळासाहेबांचं आपल्यावर फार प्रेम होतं असं म्हटलं. तसेच मोदींनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला होता. मात्र याच विधानांचा संदर्भ घेत उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने बाळासाहेबांचा उल्लेख मोदींनी केला त्यावर आक्षेप नोंदवला. "बाळासाहेबांबद्दल बोलताना काल मोदी पण म्हणाले बाळासाहेब. बाळासाहेब काय तुमच्या वर्गात होते? बाळासाहेब बाळासाहेब काय? हिंदूहृदय सम्राट म्हणाला. तुम्ही हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असं म्हटलं पाहिजे. हिंदूहृदय सम्राट बोलायला तुमची जीभ अडखळत असेल तर त्या जिभेला सरळ कसं करायचं ही माझी कोकणातीलच नाही संपूर्ण देशातील जनता जाणते," असं उद्धव ठाकरेंनी भाषणात म्हटलं.