रत्नागिरी : लॉकडाऊनमुळे अनेक नागरिक विविध जिल्हा, राज्यांमध्ये अडकले आहेत. लॉकडाऊनचा कालावधी वाढवला असला तरी रेड झोन वगळता या नागरिकांना स्वत:च्या घरी जाण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे.  रत्नागिरीतून इतर जिल्ह्यात जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रत्नागिरीतून लोकांना घरी सोडण्यासाठी एसटी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना आपल्या घरी जाता येणार आहे. 


उद्या रायगड, सिंधुदुर्ग, बुलढाणा, लातूर, भंडारा, सातारा, गोंदिया आणि अमरावतीकरता एसटी बस सोडण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील विविध बस आगारातून एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. 



यासाठी जिल्हा प्रशासनाकडून काही नियम आखून देण्यात आले आहेत. प्रवासाची परवानगी मिळालेल्या प्रवाशांकडे मेडिकल सर्टिफिकेट असणे अनिवार्य आहे. तसेच बस सुटण्याचा ठिकाणी किमान २ तास अगोदर पोहोचणे सर्व प्रवाशांसाठी बंधनकारक असणार आहे.