कोकणात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल? काय म्हणाले आरोग्यमंत्री
नाशिक आणि अमरावतीला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. तसेच आता कोकणात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल...
मुंबई : कोकणात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावे अशी मागणी कोककांतील जनतेकडून करण्यात येत आहे. त्यामुळे कोकणात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्यात यावे अशी मागणी राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी विधानसभेत केली. राज्यात १०९ रुग्णवाहिकांची अवस्था वाईट झाली असून त्यात दुरुस्ती करण्याची मागणीही त्यांनी केली.
या प्रश्नाला उत्तर देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, १०२ या क्रमांकाच्या नवीन रुग्णवाहिका ग्रामीण भागात देत आहोत. तसेच १०८ रुग्णवाहिकेत बदल करण्याचा शासनाचा विचार आहे. एक हजार रुग्णवाहिकेची फ्लिट बदलण्याचा सरकारचा विचार आहे, असे त्यांनी सांगितले.
नाशिक आणि अमरावतीला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. त्याच धर्तीवर कोकणात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावे, याचा विचार नक्कीच करु,असे आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केले.