रस्त्यावरच्या कुत्र्याला जेवण देत होती, तरूणीला भरधाव कारची टक्कर, पाहा VIDEO
Hit And Run Case: रस्त्यावरील कुत्र्यांना (Stray Dogs) जेवण देत असलेल्या एका तरूणीला भरधाव चारचाकी थार वाहनाने धडक मारली आहे. या धडकेत 25 वर्षीय तेजस्विता कौशल गंभीर जखमी झाली आहे. तेजस्विता धडक दिल्यानंतर कार चालकाने तिला वाचवण्याऐवजी घटनास्थळावरून पळ काढला होता.
Hit And Run Case: देशात दररोज रस्ते अपघाताच्या अनेक घटना घडत असतात. या अपघातात अनेक लोक जीव गमावतात,तर अनेक जण गंभीर जखमी देखील होत असतात. अशीच एक अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका तरूणीला भारधाव कारने धडक दिल्याची धक्कादायक घटना घडलीय. या धडकेत ती गंभीर जखमी झाली आहे. ही संपुर्ण घटना कॅमेरात (CCTV camera)कैद झाली आहे. या घटनेने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनाक्रम काय?
रस्त्यावरील कुत्र्यांना (Stray Dogs) जेवण देत असलेल्या एका तरूणीला भरधाव चारचाकी थार वाहनाने धडक मारली आहे. या धडकेत 25 वर्षीय तेजस्विता कौशल गंभीर जखमी झाली आहे. तेजस्विता धडक दिल्यानंतर कार चालकाने तिला वाचवण्याऐवजी घटनास्थळावरून पळ काढला होता. ही घटना फर्निचर मार्केटमध्ये घडली आहे. अपघाताची ही घटना जवळच बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
रूग्णालयात दाखल
शनिवारी रात्री 11.39 वाजता तेजस्विता दरदिवशी प्रमाणे तिच्या आईसोबत रस्त्यावरील कुत्र्यांना जेवण (Stray Dogs)देण्यासाठी गेली होती. यावेळी भटक्या कुत्र्यांना जेवण देत असताना मागून आलेल्या थार चारचाकी कारने तिला जोराची धडक दिली. या धडकेत ती दुरवर फेकली गेली. यावेळी तरूणीला धडक बसल्याचे पाहून कार चालकाने घटना स्थळावरून पळ काढला. या घटनेनंतर आईने ताबडतोब तेजस्विताला रूग्णालयात दाखल केले. तेजस्वितावर सध्या GMSH-16 मध्ये उपचार सुरू आहेत. तिच्या डोक्याला दोन्ही बाजूला टाके पडले आहेत. ती बोलत असून तिची प्रकृती ठीक आहे, असल्याची माहिती तिच्या आई-वडिलांनी दिली आहे.
तेजस्विता ही आर्किटेक्टमध्ये पदवीधर आहे आणि सध्या यूपीएससी (UPSC) परीक्षेची तयारी करत आहे. भटक्या कुत्र्यांना (Stray Dogs) खायला देण्यासाठी ती तिच्या आईसोबत रोज रात्री फर्निचर मार्केटमध्ये जाते. शनिवारी रात्रीही ती आई मनजिंदर कौरसोबत गेली होती, असे तेजस्विताचे वडील ओजस्वी कौशल यांनी सांगितले आहे. तसेच या घटनेवर ते म्हणाले की, निष्काळजीपणा दाखवणाऱ्यांवर कार चालकांवर कडक कारवाई व्हावी, अशी त्यांची इच्छा आहे.
दरम्यान चंदिगढमध्ये (Chandigarh) ही घटना घडली आहे. या घटनेत तेजस्विताच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीसह घटनास्थळावरून अपघाताचे फुटेजही काढले आहे. तसेच पोलिसांकडे ते सुपूर्द केले आहे. सेक्टर-61 पोलीस चौकीत या प्रकरणी डीडीआर दाखल केलला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहे.