`तिच्यासाठी अजूनही दार उघडे`, पतीपासून वेगळी झाल्यानंतर अभिनेत्रीला साद
दोघांचा वाद आता मीडियासमोर आल्याने एकमेकांवर आरोप केले जात आहेत.
मुंबई : अभिनेत्री चारू असोपा (Charu Asopa) आणि राजीव सेन (Rajeev Sen) यांच्यातील कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आला आहे. राजीव आणि चारू असोपा वेगळे झाल्याचं बोललं जातंय. एका मुलाखतीत चारूने आपल्या तुटलेल्या लग्नाची व्यथा व्यक्त करताना तिच्या वेदना प्रेक्षकांसोबत शेअर केल्या. चारू असोपा हिने मुलाखतीत राजीव सेन याच्यावर अनेक गंभीर आरोप केले. या सर्व आरोपांवर आपले स्पष्टीकरण देत राजीव सेन याने माध्यमांशी संवाद साधला.
चारूने केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना राजीव सेन म्हणाला की, जर तुम्हाला वाटत असेल की मी येथे चारूबद्दल उलटसुलट बोलण्यासाठी आलो आहे, तर तुम्ही चुकीचे आहात. चारू खूप भावनिक आहे, चारूला सांत्वन हवे होते जे तिला मिळाले. चारूने घरच्या गोष्टी मीडियासमोर आणायला नको होत्या. चारूने ज्या प्रकारे मला सर्वांसमोर खाली पाडले ते पाहून मी खूप दुखावलो आहे.
राजीव सेनने म्हटलं की, 'मी न सांगता घरातून निघून जायचो, असं ती म्हणाली. मी नाही म्हणणारं की हे चुकीचं आहे. पण मी अनेक महिने घरी यायचो नाही हा आरोप चुकीचा आहे.'
'कॅमेऱ्यासमोर घरातील गोष्टी उघड करणे हे बालिश वर्तन आहे. त्याचा नंतर त्रास होईल. जियाना जेव्हापासून आमच्या आयुष्यात आली आहे, तेव्हापासून मी प्रत्येक श्वासासोबत चालायला लागलोय. मला तिला चारूला एवढंच सांगायचं आहे की माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी सदैव उघडे राहतील, चारू... तू आणि जियाना यातच राहू. तुला पाहिजे तेव्हा घरी परत येऊ शकतेस. कारण हे जियानाचे घर आहे.'