Rapper Drake ने लता मंगेशकरांच्या `दीदी तेरा देवर दीवाना` गाण्याचं बनवलं रीमिक्स, Video Viral
सध्या ड्रेकच्या शोमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
मुंबई : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan) 'हम आपके हैं कौन' (Hum Aapke Hain Koun) हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटातलं 'दिदी तेरा देवर दिवाना' (Didi Tera Devar Deewana) हे गाणं तर आजही या गाण्यावर लग्नात किंवा मग संगीत कार्यक्रमात डान्स करताना आपण पाहतो. 1994 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातलं 'दिदी तेरा देवर दिवाना' हे गाणं भारतीय गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी गायलं होतं. या गाण्याचं कॅनेडियन रॅपर ड्रेक (Rapper Drake) आणि लिल वेन यांनी रिमिक्स केलं आहे. या गाण्यावर दोघांच्या परफॉर्मन्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ड्रेकनं 'दीदी तेरा देवर दीवाना' या गाण्यांचं रिमिक्स केल्याचे आपल्या सगळ्यांना दिसत आहे. हे गाणं मुळात सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. हे गाणं आजही चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि लोकांना ते खूप ऐकायला आणि बघायला आवडतं. (rapper drake viral video in lata mangeshkar didi tera devar deewana viral)
हेही वाचा : बिग बी जया बच्चन यांच्याशी असं का वागले? नात्यातील त्या वळणाची कुणालाही अपेक्षा नव्हती
या व्हिडिओला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. काही लोक या व्हिडिओला फेक म्हणत आहेत, तर काहींनी यावर टीका करत भारतीय गाण्यांशी छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. एका नेटकऱ्यानं सांगितलं की, 'मी या शोमध्ये होतो आणि तसे झाले नाही.' 'दीदी तेरा देवर दीवाना' हे लता मंगेशकर आणि एसपी बालसुब्रमण्यम यांनी गायलं होतं आणि देव कोहली यांनी लिहिले होते.
पाहा व्हिडीओ
याआधी रॅपर ड्रेकनं सिद्दू मुसेवालाला श्रद्धांजली वाहिली होती. रंटोमधील लाईव्ह शोदरम्यान ड्रेक सिद्दू मुसेवालाचा फोटो असलेला टी-शर्ट घालून आला होता. ज्यामध्ये मुसेवालाच्या जन्म आणि मृत्यूचे वर्षही लिहिले होते. ड्रेकनं यापूर्वी त्याच्या रेडिओ शो दरम्यान सिद्दू मुसेवालाची 2 गाणी वाजवली होती.