बिग बी जया बच्चन यांच्याशी असं का वागले? नात्यातील त्या वळणाची कुणालाही अपेक्षा नव्हती

'कौन बनेगा करोडपती'मध्ये अमिताभ यांनी हा खुलासा केला आहे.

Updated: Nov 10, 2022, 08:26 AM IST
बिग बी जया बच्चन यांच्याशी असं का वागले? नात्यातील त्या वळणाची कुणालाही अपेक्षा नव्हती title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) 'कौन बनेगा करोडपती 14' (Kaun Banega Crorepati 14) चे सुत्रसंचालन करत आहेत. या शोमध्ये अमिताभ स्पर्धकांशी खासगी गोष्टींवर देखील चर्चा करताना दिसतात. यावेळी स्पर्धकाशी बोलताना अमिताभ यांनी खुलासा केला की पत्नी जया (Jaya Bachchan) यांच्यासाठी लग्नाच्या सुरुवातीच्या काळात ते जया बच्चन यांच्यासाठी असं काही करायचे की कोणीही बिग बींकडून ही अपेक्षा केली नसेल. गुरुग्राम स्थित असलेल्या रुची या स्पर्धकाशी बोलताना अमिताभ यांनी हा खुलासा केला आहे.  

रुची या मीडिया विश्लेषक आहेत. अमिताभ यांच्याशी बोलताना त्यांची लहानपणीच्या मित्राशी लग्न केल्याचे सांगितले. याशिवाय लहानपणीच्या मित्राशी लग्न करण्याचे फायदे सांगितले. यंदाच्या वर्षी तिनं पहिला करवा चौथचा उपास ठेवला होता. इतकंच काय तर तिच्या पतीनंही तिच्यासाठी उपवास ठेवला हे ऐकून तिला धक्का बसला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

काय म्हणाले अमिताभ बच्चन

याविषयी सांगताना रुची म्हणाली, 'या वर्षी माझा पहिला करवा चौथ होता आणि सकाळी जेव्हा मी माझ्या पतीसाठी नाश्ता बनवला तेव्हा त्यानं सांगितलं की तो खाणार नाही कारण तो माझ्यासाठी उपवास करतोय.' यावर अमिताभ लगेच म्हणाले की 'सुरुवातीला मी देखील उपवास करायचो नंतर मी बंद केलं.' अमिताभ यांनी सांगितलेली ही गोष्ट ऐकताच रुची म्हणाली, ' सगळे  म्हणतात की लग्नाच्या सुरुवातीच्या काळात आम्ही असं करायचो आणि नंतर करायचं थांबवलं. आमच्यासोबतही असं झालं तर मला भीती वाटते. 

पुढे अमिताभ यांनी रुचीला तिचं आडनाव विचारताच रुची म्हणाली, मला असं वाटतं की आपलं नाव आपली ओळख असली पाहिजे, आपलं आडनाव नाही. लहानपणापासून मी फक्त रुची आहे. रुचीनं दिलेलं हे उत्तर ऐकताच अमिताभ यांनी त्यांच्या लहानपणीचा एक किस्सा तिला सांगितला. 'माझ्या वडिलांना कधीही जातीच्या भांडगडीत पडायचे नव्हते. त्यांचे आडनाव बच्चन नाही हे तर त्यांनी स्वत: ला दिलेलं 'कवी नाव' किंवा त्याऐवजी 'पेट नेम' होते. पण त्यानंतर जेव्हा माझा शाळेत प्रवेश करणार होते त्यावेळी माझ्या शिक्षकांनी विचारले माझे आडनाव काय लिहिणार?

हेही वाचा : अमिताभ बच्चन यांनी भीती पोटी हात जोडून केली 'ही' विनंती

अमिताभ यांनी पुढे सांगितले की, त्यानंतर जागेवरच हरिवंशराय बच्चन यांनी आपले आडनाव बच्चन ठेवण्याचा निर्णय घेतला. अमिताभ यांनी सांगितले की, अशा प्रकारे बच्चन बनणारे अमिताभ हे त्यांच्या पिढीतील पहिले व्यक्ती आहेत. (amitabh bchchan in kbc reveals he did this for wife jaya bachchan)