11,000 पगारवाल्या पोरीला हवाय 80 लाख पॅकेजवाला नवरा! सासू-सासरेही नको, व्हायरल झाली लग्नाची जाहिरात...
एका महिलेने आपल्या भावी नवऱ्या विषयीच्या अपेक्षा सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. मला एमबीए किंवा एमएस आणि शक्यतो यूएसमधीलच नवरा हवा, तो सॉफ्टवेअर इंजिनीयर असायला हवा अशा अनेक अटी तिने केल्या आहेत.
एका महिलेने आपल्या भावी पतीसाठी असलेल्या काही विशेष अटी सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. त्यामुळे चांगलीच चर्चा रंगली आहे. सोशल मीडिया यूजरर्सकडून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. बीएड पदवी असलेल्या घटस्फोटित आणि वार्षिक उत्पन्न 1.3 लाख रूपये म्हणजे महिन्याला 11 हजार रूपये पगार असलेल्या एका महिलेने आपल्या होणाऱ्या नवऱ्यासाठी मोठी यादी जाहिर केली आहे. त्यात ती म्हणते, माझ्या आदर्श जोडीदाराला दर वर्षी किमान 30 लाख रूपये मिळायला हवे किंवा तो परदेशात राहात असल्यास $96,000 म्हणजे अंदाजे 80 लाख रूपये तरी त्याने मिळवणे आवश्यक आहे. याशिवाय तिच्या भावी जोडीदाराकडे 3+BHK चे स्वतंत्र घर असावे म्हणजे तिथे तिचे पालकही राहू शकतील. तिला MBA किंवा MS, शक्यतो US मधील आणि सॉफ्टवेअर इंजिनीयर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीशीच लग्न करायचे आसल्याचे सांगितले आहे. तिने आपल्या स्वतःचे गुण, पगार आणि आपल्या भावी पतीचे अपेक्षित गुण आणि पगार यासह आपला बायोडेटा सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
या महिलेने आपल्याला प्रवास आणि 5 स्टार हॉटेल्समध्ये जाण्याची आवड असल्याचं अधोरेखित केले आहे. तिने हेही स्पष्ट केले आहे की घरातील कामे ही तिची जबाबदारी नाही. घरात तिला स्वयंपाकी आणि मोलकरीण असावी असेही वाटते. तिला तिच्या सासरच्यांपासून वेगळे राहायाला आवडेल असेही ती म्हणते.
तिच्या अजब अटींमुळे सगळ्यांचे लक्ष तिच्या या पोस्टकडे वेधले गेले आहे. यावर अनेक सोशल मीडिया यूजर्सने आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने कमेंट केली आहे की, "तिचा घटस्फोट झाला असताना तिला नवरा मुलगी मात्र अविवाहित हवा आहे. तिचे आईवडील तिच्यासोबत राहतील पण तिला सासरचे सोबत नको आहेत. तिचा पगार फक्त 11,000 रूपये महिना आहे म्हणजे शहरातील मोलकरणीच्या पगारा इतका आहे. पण तिला नवरा मात्र जास्त पगार असणारा हवा आहे.
दुसऱ्या वापरकर्त्याने प्रश्न केला, "१,३२,००० रुपये वार्षिक पगार आणि ती म्हणते की तिला 5-स्टार हॉटेल्समध्ये जाण्याचा छंद आहे, हे आश्चर्यकारकच आहे." लोकांनी तिची सध्याची आर्थिक परिस्थिती आणि तिच्या अपेक्षा यावरही टीका केली आहे. "तिला तिच्या सासरच्यांसोबत रहायचे नाही पण त्या मुलाने हिच्या पालकांसोबत रहावे अशी अपेक्षा करते! ती महिन्याला 11,000 रूपये कमवते आणि तरीही तिला पूर्णवेळ मोलकरीण आणि स्वयंपाकी हवा आहे? या अपेक्षा खुपच अती आहेत. काहींनी तर आधुनिक नातेसंबंध, लग्न याच्या बदलत्या स्वरूपावर भाष्याकेले. तर दुसरा म्हणाला की, "तिच्या खूप अपेक्षा आहेत." या पोस्टला 1.5 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत