How To Reduce High Cholesterol : सध्या बिघडलेली लाइफस्टाइल, जंक फूडचं सेवन आणि व्यायामाचा अभाव इत्यादींमुळे अनेकांना हाय कोलेस्ट्रॉलची समस्या जाणवू लागली आहे. आपल्या शरीरामध्ये चांगले आणि वाईट कोलेस्ट्रॉल असतात. या कोलेस्ट्रॉलची समस्या तेव्हा होते जेव्हा रक्त पाहून नेणाऱ्या नसांमध्ये फॅट्स जमा होतात. यामुळे ब्लड फ्लो प्रभावित होतो त्यामुळे हृदयाशी निगडित समस्या निर्माण होतात. वाढलेलं कोलेस्ट्रॉल शरीरासाठी धोकादायक ठरू शकतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हाय कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आपल्या दैनंदिन आहारात आणि जीवनशैलीत काही बदल करणे गरजेचे असते. हाय कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काही भाज्या उपयुक्त ठरतात. या भाज्यांच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. 


कांदा :


कांद्याचा वापर जवळपास प्रत्येक भाजीमध्ये केला जातो. परंतु जर तुम्हाला कांद्याच्या गुणधर्माचा जास्तीत जास्त फायदा करून हवा असेल तर त्याला सॅलेडमधे मिक्स करून खा. यामध्ये कॅलरीज कमी असतात आणि कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत मिळते. 


लसूण :


लसणाचा वापर हा जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो. परंतु लसणामध्ये अनेक औषधी गुणधर्म सुद्धा असतात ज्यामुळे आजार बरे होऊ शकतात. यामध्ये अँटी-हायपरलिपिडेमिया गुणधर्म मोठ्या प्रमाणात आढळतात, जे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करू शकतात.


हेही वाचा : युरिक ऍसिडचा त्रास होतोय? रिकाम्या पोटी प्या पिवळं पाणी, लघवीवाटे निघून जाईल सगळी घाणं


 


वांग :


अनेक घरांमध्ये वांग्याची भाजी, वांग्याचं भरीत केलं जातं. वांग्याची भाजी अनेकांना आवडते परंतु ही भाजी हाय कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. यात सॉल्यूबल फायबर आणि लो कॅलरी डायट असतात जे आरोग्यासाठी चांगले मानले जातात. 


भेंडी :


भेंडीची भाजी अनेकांना आवडते. जर दररोज भेंडीच्या भाजीचे सेवन केले गेले तर कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होऊ शकते. कांद्याप्रमाणे भेंडीमध्ये सुद्धा भरपूर फायबर आढळतात. 


हेही वाचा : कॅन्सर ते बद्धकोष्ठता, गंभीर आजारांवर रामबाण ठरतो किचनमधील एक मसाला


 


बीन्स :


बीन्स मध्ये भरपूर प्रमाणात सॉल्यूबल फायबर असतात. त्यामुळे जेवल्यानंतर खूप वेळ पोट भरल्यासारखे वाटते. नेवी बीन्स सह राजमा, चवळी इत्यादींचा सुद्धा तुम्ही आहारात समावेश करू शकता.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)