Home Remedies For Uric Acid: आजकाल खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि खराब जीवनशैलीमुळे लोकांमध्ये यूरिक ॲसिडची समस्या सामान्य झाली आहे. वास्तविक, यूरिक ऍसिड हा शरीरात एक टाकाऊ पदार्थ असतो, जो प्युरीन नावाच्या रसायनाच्या विघटनाने तयार होतो. साधारणपणे, किडनी शरीराबाहेर फिल्टर करते. पण जेव्हा किडनी व्यवस्थित काम करत नाही, तेव्हा ते सांध्याभोवती क्रिस्टल्सच्या स्वरूपात जमा होऊ लागते. त्यामुळे सांध्यांना दुखणे, सूज येणे, चालताना त्रास होणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. अशा स्थितीत युरिक ॲसिडवर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे ठरते. शरीरातील यूरिक ॲसिडची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्ही तुमचा आहार आणि जीवनशैली बदलली पाहिजे. याशिवाय काही घरगुती उपायांनीही यूरिक ॲसिडवर नियंत्रण ठेवता येते. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच एका प्रभावी घरगुती उपायाबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला युरिक ॲसिडची पातळी कमी करता येऊ शकते.
हळदीच्या पाण्याचे सेवन शरीरातील यूरिक ऍसिडची पातळी कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. यामध्ये अँटीबायोटिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात, जे शरीराला अनेक आजारांपासून वाचवण्यास मदत करतात. याशिवाय यामध्ये कर्क्युमिन नावाचे संयुग आढळते, जे सांधेदुखी आणि सूज कमी करण्यास मदत करते. हळदीचे पाणी नियमित सेवन केल्याने शरीरातील वाढलेले यूरिक ऍसिड कमी होण्यास मदत होते. याव्यतिरिक्त, संधिवात आणि ऑस्टियोपोरोसिस सारख्या रोगांचा धोका देखील कमी होतो.
हळदीचे पाणी तयार करण्यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात दोन चिमूटभर हळद टाकून चांगले मिसळा. दररोज सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्यास यूरिक ऍसिड नियंत्रित ठेवण्यास मदत होते. याशिवाय आरोग्यासाठी इतर काही फायदेही होतील.