आपला जोडीदार निवडताना प्रत्येकाने काही गोष्टींना प्राधान्य दिलेलं असतं. त्यामुळेच अनेकदा प्रियकर, जोडीदार निवडल्यानंतर जर त्या गोष्टी मनाप्रमाणे होत नसतील तर मग चिडचिड आणि भांडणं होतात. इंस्टाग्रामवरील एका रिलेशनशिप कोचने तर आपण भारतीय पुरुषांना यापुढे डेट करणार नाही असं ठरवलं आहे. तिने व्हिडीओ शेअर करत यामागील तीन मुख्य कारणं सांगितली आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यावर युजर्स कमेंट्स करत आहेत. काहींनी तिच्या भूमिकेला पाठिंबा तिला आहे, तर काहींनी विरोध केल्याने यावर चर्चाच सुरु झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेतना चक्रवर्ती असं महिलेचं नाव असून तिच्या इंस्टाग्राम बायोमध्ये 'रिलेशनशिप आणि लाईफ कोच' असं लिहिलं आहे. व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिलं आहे की, 'कबुलीची वेळ! माझ्या सिंगल क्लायंट्सना प्रेम मिळतंय आणि डेटिंगच्या वेड्या जगात हे सहजपणे वावरु शकत आहेत कारण मी तिथे आहे".


तसंच आपल्या अकाऊंटवर जी मतं मांडण्यात आली आहेत, ती आपलीच असल्याचं तिने स्पष्ट केलं आहे. “ते इतर कोणाचेही, विशेषत: माझे कुटुंब, मित्र किंवा क्लायंट यांचं मत असणं आवश्यक नाही. ते कोणाच्याही निर्णयांवर प्रभाव टाकण्यासाठी किंवा हुकूमशाहीसाठी नसतात आणि ते कोणत्याही प्रकारे मूळ नियम नाहीत,” असं ती पुढे म्हणाली.


व्हिडीओच्या सुरुवातीला ती सांगत आहे की, "मी आता भारतीय पुरुषांना डेट करत नाही. यामागे काही कारण आहेत". यानंतर तिने तीन मुख्य कारण सांगत ती सविस्तरपणे मांडली आहेत.


काय आहेत ती 3 कारणं?


1) त्यांना अवघड विषयांवर चर्चा करणं शिकवण्यात आलेलं नसतं, त्यामुळेच त्यांच्याकडे युक्तिवाद नसल्यास ते शांत बसतात आणि महिलेला नावं ठेवतात. 


2) त्यांना रोमान्स समजत नाही. महिन्यातून एकदा डिनरला नेणं म्हणजेच रोमान्स असं त्यांना वाटतं. तुमच्या महिलेला तिचं तुमच्या आयुष्यात महत्व आहे हे जावणून देणं महत्त्वाचं असतं. फक्त महागडे गिफ्ट विकत घेणं म्हणजे रोमान्स नाही. 



3) त्यांना घराची काळजी कशी घ्यायची हे माहिती नसतं. म्हणजे घरातील अर्धं काम कऱणं असा नाही. तुम्हीही त्या घरात राहत असल्याने तुम्हीही त्याची काळजी घेणं अपेक्षित असतं. हे काम करुन तुम्ही तुमच्या जोडीदारावर उपकार करत नाही.


हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चाच छेडली आहे. काहींनी सर्वच भारतीय पुरुष सारखे नसतात याकडे लक्ष वेधलं आहे. तर काहींनी आपला जोडीदार असा अजिबात नसल्याचं सांगितलं आहे. एका युजरने तिसऱ्या मताशी सर्वाधिक सहमत असल्याचं सांगितलं आहे.