भारतातील लोकप्रिय मंदिरांवरुन द्या मुलांना नावे, राम मंदिराचा देखील उल्लेख
Baby Names on Indian Temple : आज सगळीकडे `राममय` वातावरण आहे. असं असताना आपल्या मुलांमध्ये हे भक्तीमय रुप अनुभवायचं असेल तर त्यांना द्या भारतातील लोकप्रिय मंदिरांची नावे.
Ayodhya Ram Mandir Temple : भारताला ऐतिहासिक आणि धार्मिक मंदिरांचा वारसा लाभला आहे. यामध्येच अयोध्येतील राम मंदिराची भर पडत आहे. भारतातील प्रत्येक व्यक्ती आज राम मंदिराने अगदी भक्तीमय वातावरणाचा अनुभव घेत आहे. असं असताना आपल्या मुलांना द्या पवित्र अशी मंदिरांची नावे. ज्यामुळे त्यांच्यावर फक्त सकारात्मकच नाही तर धार्मिक आणि भक्तीमय संस्कार होतील.
राम नाव
अयोध्येत राम मंदिरात आज रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा करण्यात येत आहे.. जर तुम्हाला तुमच्या मुलामध्ये श्रीरामा सारखे गुण हवे असतील तर तुम्ही त्याचे नाव 'राम' किंवा 'राघव' ठेवू शकता. 'राघव' हे रामाचे एक नाव आहे. याशिवाय भोलेनाथच्या केदारनाथावरून 'केदार' हे नावही तयार झाले आहे.
सीता नाव
महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात एकांत रावेरी गावात सीतेचं मंदिर आहे. या मंदिराच्या नावावरुन आणि देवी सीतेची कृपादृष्टी लेकीवर राहावी म्हणून 'सीता' हे नाव लेकीला नक्कीच देऊ शकता. अबला, विधवा आणि अनाथ महिलांसाठी हे मंदिर एक आशेचं किरण आहे. सीतेतील गुण लेकीत यावे म्हणून या नावाचा नक्कीच विचार करु शकतो. 'लक्षाकी', 'मृण्मयी', 'पार्थवी' यासारखी नावे देखील सीतेची नावे आहेत. याचा देखील विचार करु शकता.
सूर्य नाव
भारतातील प्रसिद्ध सूर्य कोणार्क मंदिराचे नाव तुम्ही ऐकले असेलच. या मंदिरातून 'सूर्य' नाव निघाले जे तुम्ही तुमच्या मुलाला देऊ शकता. हे भगवान सूर्याला समर्पित आहे आणि त्याला 'आदित्य' म्हणून देखील ओळखले जाते म्हणून तुम्ही त्याचे नाव 'आदित्य' देखील निवडू शकता. कन्येसाठी 'लक्ष्मी' हे नावही लक्ष्मीनारायण मंदिरातून उपलब्ध आहे. हे नाव दिल्याने तुमचे घर समृद्धीने भरून जाऊ शकते.
मीनाक्षी नाव
मदुराईचे 'मीनाक्षी' मंदिर खूप लोकप्रिय आहे आणि तुम्ही तुमच्या लहान मुलीसाठी हे नाव देखील निवडू शकता. ९० च्या दशकापूर्वी मीनाक्षी हे नाव मुलींना खूप आवडले होते. 'मीनाक्षी' हे नाव भारतात खूप लोकप्रिय आहे. हे पवित्र नाव तुमच्या मुलीवर खूप सुंदर दिसेल.
वैष्णवी नाव
हे नाव मुलींसाठी देखील आहे. हे नाव वैष्णोदेवी मंदिराच्या नावावरून आहे. या मंदिरात माता राणीची 'वैष्णवी' या नावाने पूजा केली जाते. तुम्ही तुमच्या लहान मुलीसाठी हे नाव निवडू शकता. हे नाव अत्यंत पवित्र आहे.
अक्षर किंवा अक्षरा नाव
'अक्षर' आणि 'अक्षरा' ही नावे दिल्लीच्या अक्षरधाम मंदिरावरून पडली आहेत. तुम्ही मुलासाठी 'अक्षर' आणि मुलीसाठी 'अक्षरा' हे नाव निवडू शकता. अक्षरधाम मंदिर पाहण्यासाठी लांबून पर्यटक येथे येतात. 'अक्षर' नावाचा अर्थ शब्द.
सिद्धी नाव
तुम्ही तुमच्या बाळाचे नाव 'सिद्धी' ठेवू शकता. हे नाव मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराच्या नावावरून ठेवण्यात आले असून या मंदिराप्रमाणेच 'सिद्धी' हे नावही अत्यंत पवित्र आहे. मुंबईत सर्वसामान्यांसोबतच मोठ्या सेलिब्रिटीही सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी येतात आणि या शहरातच नव्हे तर जगभरातील शेकडो गणेशभक्त आहेत. याप्रमाणेच तुम्ही 'सिद्धेश' या नावाचा देखील विचार करु शकतो.
साई नाव
शिर्डी हे साईबाबांचे धाम आहे. महाराष्ट्रातील नाशिकमध्ये हे तीर्थक्षेत्र असून मुलाला 'साई' हे नाव मुलासाठी ठेवू शकता. यासोबतच 'साईनाथ' या नावाचा देखील विचार करतो.