मुलींसाठी पालक नावे निवडताना खूप विचार करतात. मुलींना अतिशय सोपी युनिक नावे देण्याकडे पालकांचा कल असतो. पण या सगळ्यात अनेकदा पालक इतकी जड आणि कठीण नावे मुलींना देतात जी नावे आजी-आजोबांना किंवा मोठ्या मंडळींना उच्चारणे कठीण होते. अशावेळी खालील नावांचा विचार मुलींच्या नावांसाठी करणे अतिशय महत्त्वाचे आहे. 


मुलींसाठी अतिशय सोपी नावे 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर्विका - आर्विका नावाचा अर्थ यूनिव्हर्सल, शाश्वत असा होतो.


शुभायी - शुभायी या नावाचा संबंध गणपती देवाशी असून त्याचा अर्थ अतिशय शुभ आहे. गणपतीच्या पुत्राचे नाव शुभ मानले जाते.


गानवी - गानवी हे देखील गणपतीशी निगडित एक नाव आहे.


कृतिनी - कृतिनी म्हणजे स्किलफुल. अशी मुलगी जिच्याजवळ योग्यता, क्षमता आहे. त्याचा संबंध गणपतीशी जोडलेला आहे.


चिन्मयी - चिन्मयी हे गणपतीचे नाव आहे. तुम्ही तुमच्या मुलीला चिन्मयी हे नाव देऊ शकता. ज्याचा अर्थ आनंदी असा आहे.


सिद्धिदा - सिद्धिदा म्हणजे यश. या नावाचा संबंध गणपतीच्या दोन पत्नी रिद्धी आणि सिद्धी यांच्याशी आहे.


इहिका - इहिका या नावाचा अर्थ बलवान असा होतो.


गन्वी - हे नाव गणेशाच्या नावावरून पडले आहे. ज्याचा अर्थ भक्ती असा होतो.


विदमही - हे भगवान गणेशाचे नाव आहे.


निर्विघ्ना - विघ्नहर्ता श्री गणेशाच्या नावावरून मुलीला निर्विघ्ना नाव देऊ शकता.


रिद्धिता - सिद्धी प्रमाणेच रिद्धिता नाव देखील मुलीला देता येते. हे अतिशय यूनिक नाव आहे.


शाश्वता - हे नाव भगवान गणेशाच्या नावावरून इंस्पायर्ड आहे.


अवनीशा - अवनीशा हे भगवान शंकराचे नाव आहे, ज्यावरून अवनीशा हे नाव प्रेरित झाले आहे.