Bedwetting Habit in Children: झोपताना अंथरुण ओले करणे या अनेक मुलांच्या समस्या असतात. वयाच्या 5 ते 6 वर्षांपर्यंत मुलांना या गोष्टींना सामोरे जावे लागते. परंतु त्यानंतरही मूल झोपेत असेच करत राहिल्यास ते पालकांसाठी त्रासाचे कारण बनते. कोणत्याही पालकाला आपल्या मुलाचे कपडे आणि चादरी दररोज धुवावे असे वाटत नाही. याचा मुलाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. याबाबत घाबरून न जाता काही महत्त्वाच्या उपाययोजना करता येतील.


हे कसे थांबवाल?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बहुतेक बाल तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, मुले 5 वर्षांची होईपर्यंत त्यांच्या मूत्राशयावर पूर्णपणे नियंत्रण ठेवतात. परंतु आठवड्यातून किंवा महिन्यातून 2-3 वेळा झोपेच्या वेळी अंथरुण ओले होत असेल तर ही समस्या समजली जाईल. मात्र, पालकांनी काही गोष्टींची काळजी घेतल्यास ही समस्या दूर होईल.


पालकांनी कराव्यात 7 गोष्टी 


1. सर्वप्रथम, पालकांनी मनाची तयारी करावी की, मुलाने झोपेत बिछाना ओला केला तर त्याला ओरडणार नाही. कारण यामुळे तो तणावाखाली असेल, शेवटी तो हे जाणूनबुजून करत नाही.
2. ज्या दिवशी सकाळी तुमच्या लक्षात येईल की मुलाने अंथरुण ओले केले नाही, तेव्हा त्याबद्दल त्याचे कौतुक करा आणि त्याला सांगा की आता ही सवय सुधारत आहे, यामुळे त्याला प्रोत्साहन मिळेल.
3. मुलाला खात्री द्या की; तुम्ही त्याच्यासोबत आहात आणि ही या वयातील एक सामान्य समस्या आहे जी एक दिवस बरी होईल, यामुळे त्याला लाज वाटणार नाही.
4. झोपण्यापूर्वी, पालकांनी खात्री केली पाहिजे की त्यांच्या मुलाने लघवी केली आहे की नाही, त्यांना लघवी करण्याची आवश्यकता वाटत नसली तरीही, त्यांना शौचालयात जाण्यास प्रोत्साहित करा.
5. झोपण्याच्या 2 तास आधी मुलाला पाणी किंवा कोणताही द्रव पदार्थ देऊ नका. दिवसभरातील त्यांच्या पाण्याची गरजा पूर्ण करा, यामुळे झोपेच्या वेळी लघवीची समस्या कमी होईल.
६. तुमचे मूल रात्री किती वाजता बेड ओले करते हे जर तुम्हाला कळले तर अर्धा तास आधी अलार्म लावा आणि मग मुलाला उठवा आणि टॉयलेटला जाण्यास सांगा.
7. सर्व प्रयत्न करूनही जर मुल रात्री अंथरुण ओले करत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. खरे कारण शोधा आणि नंतर निश्चितपणे उपचार करा. जरी अनेकदा असे दिसून येते की, एका विशिष्ट वयानंतर ही समस्या स्वतःच निघून जाते.