Hanuman Jayanti : महाराष्ट्रात हनुमान जयंतीला बनवतात पौष्टिक गव्हाची खीर! Video पाहून मिळेल मदत
Wheat Kheer Recipe in Marathi : देशभरात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. महाराष्ट्रात हनुमान जयंतीला खास आणि पौष्टिक अशी गव्हाची खीर करण्याची परंपरा आहे.
Bhog for Lord Hanuman Wheat Kheer Recipe in Marathi : हनुमान जन्मोत्सवाची जय्यत तयारी जोरदार सुरु आहे. महाराष्ट्रातही हा उत्साहत साजरा करण्यात येतो. संकटमोचन हनुमान हे सर्व संकटातून मुक्ती देतात अशी मान्यता आहे. हनुमाजींना प्रसन्न करण्यासाठी त्यांना बुंदीचा लाडू किंवा बुंदी, लवंग, वेलची, सुपारी आणि इमरती अर्पण केली जाते. महाराष्ट्रात हनुमान जयंतीला एक विशिष्ट खीर करण्यात येते. तुम्ही तांदळाची खीर खाल्ली आहात पण गव्हाची ही खीर तुम्हाला खूप आठवडले आणि हनुमाजी प्रसन्न होती. (Bhog for Lord Hanuman Wheat Kheer Recipe made on Hanuman Jayanti in Maharashtra in Marathi )
गव्हाची खीर बनवण्याची पद्धत !
गव्हाची खीर बनवण्यासाठी एक वाटी गहू एका भांड्यात घ्या. आता या गव्हाला थोड्या पाण्याने 15 मिनिटांसाठी भिजत ठेवा. आता हे भिजलेले गहू थोडे थोडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन पल्स मोडवर दोन ते तीन वेळा फिरवून घ्या. आता हे मिक्समध्ये फिरवलेले गहू एका ताटात काढा आणि पाखडून घ्या.
आता पखडलेल्या गहू 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्या. आता धुतलेल्या गव्हामध्ये 2 वाटी गरम पाणी टाकून 3 तासासाठी भिजजत ठेवा. 3 तासानंतर हे भिजलेले गहू कुकरमध्ये टाका आणि त्यात चिमूटभर मीठ टाका. आता त्यात ओल्या नारळाचे काप टाका आणि स्लो गॅसवर 5-6 शिट्या करुन घ्या. कूकर उघड्या आणि त्यात एक वाटी गूळ आणि 1 चमचा भाजलेली खसखस टाका.
आता त्यात वेलची पूड, जायफड पूड, सुंठ पावडर, कुटलेली बडीशेप टाका आणि आता ही खीर नीट मिक्स करा. आता या खीरमध्ये 1मोठा चमचा तूप घाला आणि हनुमान जयंतीसाठी गव्हाची खीर नैवेद्यासाठी तयार आहे. अनेक जणांना या गव्हाच्या खीरवर ताज दूध आणि सायसोबत खायला खूप आवडतं.