आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीशास्त्राबाबत अनेक मोलाचे सल्ले दिले आहे. याचा अवलंब जर जीवनात केला तर त्याचा अद्भुत परिणाम पाहायला मिळत आहे. तसेच चाणक्यांनी दिलेल्या सल्ल्यातील प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असते. आचार्य चाणक्य यांनी काही लोकांचे वर्णन केले आहे जे हुशार, समजूतदार असूनही मूर्ख ठरतात. हे लोक कोणते? त्यांच्यातील कोणते स्वभाव दोष म्हणून अधोरेखित होतात, ते पाहूया. 


हे लोक ठरतात मूर्ख 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चाणक्य नीतिमध्ये म्हटलंय की, जे लोक स्वतःला अतिशहाणे समजतात. चाणक्य नीतीमध्ये असे म्हटले आहे की, जो व्यक्ती स्वतःला खूप ज्ञानी समजतो किंवा नेहमी स्वतःची स्तुती करतो, अशा लोकांना अनेकदा मूर्ख समजले जाते. कारण कोणीही बोलत नसताना किंवा त्यांच्या सौंदर्याची स्तुती करत नसतानाही हे लोक आपले ज्ञान सर्वत्र शेअर करत असतात. अशा स्थितीत तुमच्याकडे कितीही ज्ञान असले किंवा तुम्ही कितीही सुंदर असाल तरी गरज असल्याशिवाय बोलू नये.


कोणताही सन्मान मिळवू नका


आचार्य चाणक्य यांनी, आपल्या निती शास्त्रात म्हटले आहे की, जे लोक इतरांशी उद्धटपणे बोलतात किंवा नेहमी इतरांचा अपमान करत राहतात त्यांना कोणीही आदर देत नाही. हे लोक कितीही प्रतिभावान असले तरीही ते मूर्ख असतात. कारण त्यांच्या अशा स्वभावामुळे ते अतिशय मूर्ख ठरु शकतात. 


हे देखील मूर्खांच्या श्रेणीत समाविष्ट


आचार्य चाणक्य यांच्या मते, अशा लोकांनाही मूर्ख मानले जाते, जे कोणतेही काम आधी सुरू करतात आणि मग त्याचे परिणाम काय होतील याचा विचार करतात. अशा लोकांना आयुष्यात खूप नुकसान सहन करावे लागते. त्यामुळेच आचार्य चाणक्यांनी विचार न करता काम करणाऱ्या लोकांची मुर्ख अशी वर्गवारी केली आहे. अनेकदा लोकं परिणामांचा विचार न करता अशा पद्धतीने वागतात ते कितीही विद्वान आणि बुद्धीमान असले तरीही ते मूर्ख ठरवले जातात.