Drinking Coffee Can Increase Life Span : कॉफीची क्रेझ आजकाल लहानांपासून मोठ्यांना सुद्धा आहे. कॉफी लव्हर आणि चाय लव्हर असं अनेक लोक स्वत: ची ओळख करुन देतात. अनेकदा कॉफी पिण्यावरून संभ्रम निर्माण होतात. अनेकदा कॉफी दिवसातून किती वेळा प्यावी, कोणत्या प्रकारची कॉफी प्यावी या सगळ्या गोष्टींवर चर्चा सुरु असते. त्यानंतर कोणत्या प्रकारची कॉफी प्यायची या सगळ्या गोष्टींवर चर्चा सुरु असते. त्याशिवाय अनेकदा असं म्हटलं जातं की कॉफी प्यायल्यानं जिवाला धोका निर्माण होतो. दरम्यान, नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, जर योग्य प्रमाणात आपण कॉफी प्यायलो तर आयुर्मान वाढतं. त्यातही 1.8 वर्ष इतकं आपलं आयुष्य वाढतं. त्यामुळे तुम्ही योग्य प्रमाणात कॉफी प्यायलात तर नक्कीच तुमचं आयुष्य वाढेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एजिंग रिसर्च रिव्ह्यू जर्नल, या अभ्यासात समोर आलेल्या माहितीनुसार, ही गोष्ट समोर आली आहे की आपण कॉफी प्यायल्यानं आयुष्य दोन वर्ष वाढतं. यावेळी दोन गटांवर अभ्यास करण्यात आला, एक सर्वसाधारन आयुष्य जगणारे आणि दुसरं योग्य पद्धतीत कॉफीचे सेवन करणाऱ्या लोक निरोगी आयुष्य जगतात. 


पोर्तुगालमध्ये असलेल्या युनिव्हर्सिटी ऑफ कोइंब्रामध्ये Rodrigo Cunha यांनी हा अभ्यास केला. ते म्हणाले, आम्हाला माहितीये की जगात लोकं हे वयाच्या आधी म्हातारे होत आहेत. त्यामुळे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की आपला आहार किती महत्त्वाचा आहे. ज्यामुळे आपल्या निरोगी आयुष्य जगू शकतो. 


या सगळ्यात, NDTV नं दिलेल्या माहितीनुसार, नियमितपणे कॉफी प्यायल्यानं अनेक आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी योग्य पर्याय आहे. कॉफी प्यायल्यानं हृदयासंबंधीत समस्या आणि इतर अनेक आजारांपासून सुटका मिळते. 


हेही वाचा : Vitamin D Deficiency: सूर्यप्रकाशात ठेवलेलं पाणी प्यायल्यानं मिळतं व्हिटामिन डी?


दरम्यान, Rodrigo Cunha यांच्या रिसर्चनुसार, नियमतपणे एका प्रमाणात कॉफीचे सेवन केल्यास आपलं शरीर योग्य पद्धतीनं कार्य करतं. यामुळे नैसर्गिकरित्या वय होण्याची प्रक्रिया ही मंदावते. या रिसर्चमध्ये आणखी एक गोष्ट समोर आली आणि ती म्हणजे कॉफीमध्ये असलेला एक गुणधर्म बायोएक्टिव्ह कंपाऊंड्स. त्यामुळे अँटिऑक्सिडंट्स मिळतात. 


(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)