Vitamin D Deficiency: सूर्यप्रकाशात ठेवलेलं पाणी प्यायल्यानं मिळतं व्हिटामिन डी?

Vitamin D Deficiency : सूर्यप्रकाशात पाणी ठेवल्यानं त्यातून मिळतं व्हिटामिन डी? जाणून घ्या सविस्तर  

दिक्षा पाटील | Updated: Dec 5, 2024, 06:31 PM IST
Vitamin D Deficiency: सूर्यप्रकाशात ठेवलेलं पाणी प्यायल्यानं मिळतं व्हिटामिन डी?  title=
(Photo Credit : Freepik)

Vitamin D Deficiency : आजकाल अनेक लोकं हे शरिरात व्हिटामिन्स आणि मिनरल्सची कमी असल्याच्या समस्येला तोंड देतात. त्यात दोन प्रकार आहेत ते म्हणजे व्हिटामिन बी 12 आणि व्हिटामिन-डी ची कमी. जर कोणत्याही एका व्हिटामिनची कमी असेल तर आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. त्यानंतर मग सप्लीमेंट घेण्याचा सल्ला देतात. त्यानंतर सन चार्ज वॉटरचं देखील ट्रेंड वाढलं आहे. सन चार्ज वॉटर काय असतं आणि त्यामुळे शरिरातील व्हिटामिन डी वाढतं का? याविषयी स्वत: डायटिशिन राधिका गोयल यांनी सविस्तर माहिती दिली आहे. 

सूर्य प्रकाशात ठेवलेल्या पाण्याला सन चार्ज वॉटर म्हणतात. आजकाल त्याचं ट्रेंड सुरु झालं आहे. अनेकांचं म्हणणं आहे की या पाण्याचं सेवन केल्यानं शरीरातील व्हिटामिन-डी ची लेव्हल वाढू शकते. पण हे पूर्णपणे चुकीचं असल्याचं राधिका यांनी सांगितलं. सूर्यप्रकाशात पाणी ठेवल्यानं त्यात येणाऱ्या सूर्यप्रकाशानं कोणतीही एनर्जी किंवा गुण मिळत नाही. जेव्हा आपली त्वचा ही सूर्य प्रकाशाच्या संपर्कात येतात, तेव्हा नक्कीच शरीरात व्हिटामिन-डी मोठ्या प्रमाणात मिळतं. त्यामुळे व्हिटामिन-डी ची कमी असेल तर सूर्यप्रकाशात राहण्याचा सल्ला देतात. पण सूर्यप्रकाशात पाणी ठेवून ते पाणी प्यायल्यानं व्हिटामिन-डी मिळत नाही. 

कशातून मिळतं व्हिटामिन-डी ?

1. व्हिटामिन-डी आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. व्हिटामिन-डी असेल तर दात आणि हाडं मजबूत होतात. 
2. त्यानं रोग प्रतिकार शक्ती वाढते. 
3. शरिरातील व्हिटामिन-डी ची कमतरता वाटत असेल तर टी-सेल्सचं प्रोडक्शन कमी होतं. महत्त्वाचं म्हणजे या टी-सेल्समुळे अनेक आजार होण्यापासून आपण वाचतो. 
4. व्हिटामिन-डी स्ट्रेसला कमी करण्यास मदत करते. 
5. व्हिटामिन-डी मसल्सची वाढ होण्यास देखील मदत करते. 
6. व्हिटामिन-डी योग्य प्रमाणात असेल तर पचनक्रिया होण्यास मदत होते. 
7. व्हिटामिन-डीमुळे टाईप 2 डायबिटीज देखील होत नाही. 
8. त्याशिवाय मेंदूची शक्ती वाढते आणि त्यामुळे तुमची बुद्धी ही तल्लीन होते. 

कोणत्या पदार्थांमध्ये Vitamin D मिळतं

1. मशरुम
2. संत्री 
3. केळ
4. पालक
5. दही
6. टोफू
7. चीज

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)