बायकोचा वाढदिवस विसरलात तर होईल तुरुंगवासाची शिक्षा! नेमकं काय आहे प्रकरण
Weired Law in World : लग्नाचा वाढदिवस, स्वत: चा वाढदिवस, आयुष्यातील पहिल्या भेटीचा दिवस असे अनेक दिवस महिलांना साजरे करायला फार आवडतात. पण बऱ्याचदा पतीकडून कामाच्या व्यापात हे दिवस लक्षात ठेवायचं राहून जातं आणि मग बायको चिडते किंवा रुसते. पण आता असे करुन चालणार नाही. कारण आता बायोकाचा वाढदिवस विसरला तर तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागले. नेमकं काय आहे प्रकरण ते जाणून घ्या...
Weired News in Marathi: अनेक पुरुषांसाठी लग्नाचा वाढदिवस लक्षात ठेवणे कठीण होऊन जाते. तर दुसरीकडे त्याचबाबतीत स्त्रियांना आपल्या आयुष्यातील सगळ्या तारखा अगदी नीट लक्षात असतात, पण पुरुषांची अशावेळी गोची होते आणि हमखास ते अनेक दिवस विसरून जातात, त्यापैकीच एक लग्नाचा वाढदिवस (marriage anniversary) असतो. हा दिवस नात्यासाठी अगदी स्पेशल असून तो नेहमी दणक्यात साजरा करावा अशी स्त्रियांची इच्छा असते पण साहजिक नवरा तो विसरल्यावर त्यांचा मूड ऑफ होतो आणि रुसव्या फुगव्याचं सत्र सुरु होतं. कधीकधी तर भांडण वाढून नातं तुटण्यापर्यंत गोष्टी जातात.
मात्र जर कुणी बायकोचा वाढदिवस विसरेल तर त्याला तुरुंगात जावं लागेल, असा नवा कायदा एका देशात असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. दरम्यान एखाद्या देशाची संस्कृती, तिथल्या प्रशासनाचे स्वरुप आणि कायदा सुव्यवस्थेची गरज लक्षात घेऊन कायदे तयार केले जातात. मात्र काही असे कायदे असतात, जे जुने असतात आणि कधीच बदलण्यात येत नाहीत. असे कायदे अनेकदा निरुपद्रावी असेल, तरी कधी कधी मात्र त्याचे भलतंच अवडंबर माजल्याचे दिसून येतं.
बायकोचा वाढदिवस विसरले तर तुरुंगवासाची शिक्षा
जगात असा एक देश आहे जिथे पत्नीचा वाढदिवस विसरणं ही पतीसाठी मोठी समस्या मानली जाते. या देशात पत्नीचा वाढदिवस विसरण्याबाबत देशात अनोखा कायदा आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, येथे चुकूनही पत्नीचा वाढदिवस विसरले तर पतीला तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
सामोआ हा पॅसिफिक महासागरातील पॉलिनेशियन प्रदेशातील एक देश आहे. आयर्लंड हा देश त्याच्या सौंदर्यासाठी आणि विचित्र कायद्यांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. समोआचा कायदा एका छोट्याशा चुकीसाठीही पत्नीला तुरुंगात पाठवू शकतो. सामोआच्या कायद्यानुसार जर एखादा पती चुकूनही आपल्या पत्नीचा वाढदिवस विसरला तर तो एक मोठा गुन्हा मानला जातो. त्यानंतर पत्नीने तक्रार केली तर पतीला तुरुंगातही जावं लागू शकतं. सामोआमध्ये बायकोचा वाढदिवस विसरणाऱ्या पतीला पहिल्यांदा वॉर्निंग दिली जाते. जर त्याने पुन्हा तिच चूक केली तर त्यांना तुरुंगवासाची शिकवण दिली जाते.
दरम्यान काही वर्षांपूर्वी एका पत्नीने आपल्या पतीला मोबाईलवरून दुसऱ्या महिलेसोबत चॅट करताना पाहिलं होतं. त्यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाले. त्यातून निराश होऊन महिलेनं स्वतःला पेटवून घेतलं होतं. या घटनेची देशात जोरदार चर्चा झाली होती आणि पती-पत्नी संबंधांबाबत चर्चाही झडली होती. याच वेळी एक कायदा तयार करण्यात आला होता. या कायद्यानुसार पतीनं पत्नीकडं दुर्लक्ष करणं, हा गुन्हा असल्याचं म्हणण्यात आलं होतं. मात्र या मूळ कायद्याचा विपर्यास आणि थट्टा होत होत त्याचा संबंध वाढदिवस लक्षात ठेवण्याशी जोडण्यात आला, अशी माहिती आहे.