Chakka and Shrikhand Recipes for Gudi Padwa : हिंदू नवंवर्ष म्हणजे महाराष्ट्रातील लोकांचा गुढीपाडवा. यादिवशी महाराष्ट्रात दारोदारी रांगोळी, विजयी गुढी उभारली जाते. मराठी लोकांचं नवीन वर्ष चैत्र महिन्याची ही सुरुवात असते. यादिवशी मोठ्या शोभायात्रा, मराठी संस्कृतीचं दर्शन पाहिला मिळतं. घरोघरी उत्साहपूर्ण वातावरण असतं. नवीन पहाट नवीन सुरुवात. गुढीपाडव्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तापैकी शुभ दिवस असतो. त्यामुळे या दिवशी सोने खरेदी, घरं किंवा गाडी खरेदी करण्यात येतं. या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. गुढीपाडवा म्हटलं की, अजून एक आर्वजून गोष्ट होते म्हणजे ती म्हणजे श्रीखंड पुरीचा बेत. ( Gudi Padwa 2024 know how to make chakka recipe for making Shrikhand at home)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हल्ली बाजारात वेगवेगळ्या चवीचे श्रीखंड उपलब्द आहे. केशर श्रीखंड, आम्रखंड, पिस्ता श्रीखंड यासोबत गरमा गरम पुरीची मजा काही और असते. पूर्वी घरातच श्रीखंड तयार केलं जायचं. पण आज धावपळीच्या जगात वेळे अभावी श्रीखंड विकत आणला जातो. काही जण आजही श्रीखंड घरी करतात पण त्यासाठी लागणारा चक्का बाजारातून विकत आणला जातो. हो, गुढीपाडवा असल्याने हा चक्का अतिशय महाग मिळतो. शिवाय तो भेसळयुक्त देखील असू शकतो. मग कशाला हवा विकतचा चक्का आणि श्रीखंड?


घरीच तयार करा श्रीखंड, कधी विकत आणणार नाही...


आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी चक्का आणि श्रीखंड बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. तुमच्या हाताचं घरगुती श्रीखंड खाऊन घरातील खूष होतील आणि कधी विकत आणणार नाही श्रीखंड हे नक्की. 


हेसुद्धा वाचा - Gudi Padwa 2024 : गुढी पाडव्याला खरेदी करण्याची परंपरा का आहे?


चक्का कसा करावा?


सर्वप्रथम आपण चक्का कसा तयार करायचा हे पाहूयात. यासाठी तुम्हाला बारीक असं मलमलचं कापड लागेल. आता 300 ग्रॅम चक्का तुम्हाला हवा असेल तर यासाठी 500 ग्रॅम ताजे दही घ्या. दही पण घरी तयार केलं असेल तर उत्तम. आता हे दही त्याता मलमलच्या कापड्यात टाकून त्याची पोतडी बनवा. ही पोतडी किचनच्या बेसिनच्या नळाला एक दिवस बांधून ठेवा. आता त्यावर अर्धा तास वजन ठेवा. यामुळे दह्यात उरलेलं पाण्याचा अंश निघून जाईल. आता तुमचा चक्का तयार झाला. 



श्रीखंड कसं करावं?


आता या चक्का पासून आपण श्रीखंड तयार करुयात. एका भांड्यात हा चक्का घ्या आणि तो चांगला फेटून घ्या. त्यात एकही गुठळी राहता कामा नये तर छान पातळ झाला पाहिजे. आता चवीनुसार यात पिठीसारख मिक्स करा. हे तुमच साधं श्रीखंड तयार. यात तुम्ही सुका मेवा टाकल्यास ड्रायफूट श्रीखंड तयार होईल. केशर घातल्यास केशर श्रीखंड त्याशिवाय तुम्ही यात जे काही मिक्स कराल त्या चवीच श्रीखंड तुम्हाला मिळेल.