Gudi Padwa 2024 : इंग्रजी कॅलेंडरनुसार 1 जानेवारी 2024 पासून नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. तर हिंदू आणि मराठी नवं वर्ष हे चैत्र महिन्यापासून होतं. फाल्गुन अमावस्या संपल्यावर नव्या वर्षाची नवी सकाळ होते. मराठी लोकांसाठी हा सण म्हणजे मराठी परंपरेने नटलेला विजयाचा सण असतो. फाल्गुन हा शेवटचा महिना असतो. चैत्र महिना हा मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलच्या सुरुवातीला सुरु होतो. हिंदू नववर्षाला विक्रम संवत, संवत्सर, गुढी पाडवा, युगादी असं संबोधलं जातं. (Why is it a tradition to buy gold Gudi Padwa)
यंदा चैत्र महिन्याची सुरुवात 9 एप्रिल 2024 पासून होते आहे. या नवीन वर्षांची सुरुवात प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने करतात. सिंधी समाजाचे लोक चेटी चंद, महाराष्ट्रात गुढीपाडवा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात युगादी, तेलंगणात उगादी, गोवा आणि केरळमध्ये कोकणी समाजाचे लोक, काश्मीरमधील नवरेहचा संवत्सर पाडवा आणि मणिपूरमधील साजिबू नोंगमा पनबा हे सण साजरा करण्यात येतात.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडवा हा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. महाराष्ट्रात यादिवशी घरोघरी गुढी उभारली जाते. यादिवशी महाराष्ट्रात खरेदी करण्याची परंपरा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडव्याला सोनं खरेदी, गाडी किंवा घर खरेदी करणे शुभ मानले जाते. यादिवशी नवीन वस्तू खरेदी किंवा गुंतवणूक करणे अतिशय शुभ मानले जाते. असं म्हणतात यादिवशी शुभ मुहूर्तावर खरेदी केल्यास घरात सुख समृद्धी दुपट्टीने वाढ आणि कायम लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे या सुवर्ण संधीचं सोनं करण्यासाठी बाजार ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर्स देतात. यंदा गुडीपाडव्याला तब्बल 30 वर्षांनंतर अमृत सिद्धी योग जुळून आला आहे. या योगामध्ये खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यासोबत गजकेशरी योगसोबत सर्वार्थ सिद्धी योग, षष्ठ योग आणि अश्विनी नक्षत्र शुभ संयोग असणार आहे.
हिंदू नववर्ष विक्रम संवतावर आधारित असून धर्मग्रंथांमध्ये एकूण 60 संवत्सरांचा उल्लेख पाहिला मिळतो. विक्रम संवत 2081 9 एप्रिल 2023 पासून सुरू होणार असून 2081 हे नवीन वर्ष 'क्रोधी' म्हणून ओळखलं जाणार आहे. हे वर्ष संवतचा राजा मंगळ आणि मंत्री शनिचं असणार आहे.
तज्ज्ञांच्यानुसार या वर्षात भारताचे विकासदर कमी होण्याचे संकेत आहे. तर नवीन रोग किंवा नवीन महामारी येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राहू, मंगळ, सूर्य आणि शनि यांच्यामुळे नैसर्गिक आपत्तीची भीती आहे. तर वादळ, भूकंप, पूर यांमुळे जीवित आणि वित्तहानी भाकीत करण्यात आलंय. राजकीय पक्षांमधील वैराची भावना वाढता दिशणार असल्याचं भाकीत ज्योतिषशास्त्रात करण्यात आलंय. भारतातील अंतर्गत संघर्ष वाढण्याची शक्यताही आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)