Viral Gulaab Pakode : आजकाल जेवणाच्या नावाखाली काही लोक अशा गोष्टी बनवू लागले आहेत की, लोकांचा विश्वास बसणार नाही. वेगवेगळ्या पदार्थांचे असंख्य व्हिडिओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत असतात. कधी लोक कोल्ड ड्रिंक्स मॅगी बनवताना दिसतात तर कधी मसाला आईस्क्रीम. एवढेच नाही तर काही खाद्यपदार्थ विक्रेते रसगुल्ला चहापासून ते कडुनिंबाच्या पराठ्यापर्यंत सर्व काही बनवताना दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे पदार्थ खरंच खाण्याजोगे असतात का? तर पुढची रेसिपी पाहा.


व्हायरल व्हिडिओ येथे पहा



अलीकडे, अशाच एका स्टॉलवरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो खाद्यपदार्थांवर प्रयोग करताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती आपल्या फूड गाडीवर पकोडे बनवताना दिसत आहे. आता तुम्ही विचार करत असाल की यात कोणती मोठी गोष्ट आहे, प्रत्येकजण पकोडे बनवू शकतो. पण हा व्यक्ती बटाटा, कोबी किंवा पनीर पकोडे बनवत नाही तर चक्क गुलाबाच्या फुलांचे पकोडे बनवताना दिसला आहे. होय तुमचा विश्वास बसणार नाही. पण व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ही व्यक्ती गुलाब तळून पकोडे बनवत आहे.


इतकेच नाही तर व्हिडिओमध्ये एक माणूस हा पकोडा खातानाही दिसत आहे. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसेल की,ती व्यक्ती आधी गुलाबाचे पाकळ्या त्याच्या देठापासून वेगळे करते. त्यानंतर तो धुवून बेसनात मिसळतो. यानंतर, तो गुलाबाची पाकळ्या गरम तेलात टाकतो आणि तळतो. एवढेच नाही तर पकोडे तयार झाल्यावर तो लोकांना खायला देतानाही दिसतो.


हा व्हायरल व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @blessedindianfoodie नावाच्या अकाऊंटद्वारे शेअर करण्यात आला आहे. हा कार्ट मालक कोणत्या शहराचा आहे आणि व्हिडिओ कुठला आहे याबद्दल कोणतीही माहिती मिळू शकली नाही, परंतु सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.


या व्हिडिओला आतापर्यंत 28 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले – “गुलाब पकोडा खा आणि तुमचे हरवलेले प्रेम परत मिळवा!” दुसऱ्याने अतिशय मजेशीर पद्धतीने लिहिले - "मी मुलीला गुलाब द्यावे की तिला गुलाब पकोडे द्यावे?" तिसऱ्याने लिहिले- “गुलाबाच्या आत छोटे कीटक असतील तर काय होईल?” दुसऱ्या यूजरने लिहिले - ब्रेकअप झालेल्यांसाठी हा पकोडा आहे.