क्रिकेटर आणि मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक यांचा घटस्फोट असल्याची चर्चा सुरु आहे. या दोघांच्या लग्नाला 4 वर्षे झाली असून यांना एक मुलगा आहे. हार्दिक आणि नताशा 31 मे 2020 रोजी लग्नबंधनात अडकले. तसेच 30 जुलै 2020 रोजी दोघांनी अगस्त्यला जन्म दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिक आणि नताशा एकमेकांसोबतची एकही पोस्ट सोशल मीडियावर करत नाहीत. तसेच नताशाने सोशल मीडियावरुन पांड्या हे आडनाव काढून टाकलं आहे. तसेच नताशाच्या वाढदिवासाला हार्दिकने शुभेच्छा न दिल्यामुळे ही चर्चा सुरु झाली. 


सध्याच्या काळात घटस्फोट ही सामान्य बाब होत चालली आहे. अवघ्या 4 वर्षांत नताशा आणि हार्दिक वेगळे होत आहेत. अशावेळी कमी वेळात वेगळं होण्यामागची कारणे काय असू शकतात, हे एक्सपर्टकडून जाणून घेऊया. 


सेलिब्रिटीच्या घटस्फोटाची कारणे 


जसे की सेलेब्स लांबचा प्रवास करतात, काही महिने असाइनमेंटसाठी जावे लागते, प्रसिद्धीच्या झोतात राहावे लागते, सोशल मीडियाचा खूप दबाव असतो की तुम्हाला तुमच्या चाहत्यांमध्ये गुंतून राहावे लागेल आणि काहीतरी नवीन करावे लागेल. हे सेलेब्सचे लक्ष देखील आकर्षित करते ज्यामुळे ते त्यांच्या नात्यापेक्षा त्यांच्या कामात जास्त वेळ घालवतात. अशावेळी एकमेकांना वेळ न देणे. आपल्या नात्यापेक्षा कामाला अधिक महत्त्व देणे. 


एकटेपणा


अनेक कपलमध्ये एकटेपणा कायम राहतो. व्यस्ततेमुळे एखाद्याला एकटेपणाही जाणवतो. ज्यामुळे व्यक्तीचे आकर्षण दुसऱ्याकडे वाढू लागते. अनेक कपल या एकटेपणातून जात असतात. अशावेळी दुसऱ्या आधाराचा विचार केला जातो. किंवा नात्याबद्दलचे मत नकारात्मक होते. अशा परिस्थितीत फसवणूक होण्याची शक्यताही जास्त असते. 


तडजोड न करणे 


अनेक कपल तडजोड करायला तयार होत नाही. हाच स्वभाव घटस्फोटाला कारणीभूत ठरु शकते. नात्यामध्ये अगदी सुरुवातीपासून दोघांनी तडजोड करणे आवश्यक आहे. मग ती तडजोड कामात, विचारात, स्वभावात सगळीकडे असू शकते. अशावेळी कपलने एकमेकांना महत्त्व देऊन तडजोड करणे आवश्यक आहे. 


एकमेकांचा आदर न करणे 


नात्यामध्ये एकमेकांना आदर तितकाच महत्त्वाचा आहे. कारण यामुळे तुमच्यात प्रेम वाढणार आहे. पण आपल्या आजूबाजूला कपल एकमेकांना आदर देत नसताना दिसतात. हे एक घटस्फोटाचे कारण ठरु शकते. कारण आदर आहे तेथे प्रेम हे असतेच. आदर हा समान असावा. त्यामुळे कपलने एकमेकांची बाजू समजून घेणार आहे.