Baby Names on Hartalika :  हिंदू धर्मात हरतालिकेच्या व्रताला भरपूर महत्त्व आहे. गणेश चतुर्थीच्या एक दिवस अगोदर हा उपवास असतो. हा उपवास लग्नापूर्वी कुमारीका धरतात. चांगला नवरा मिळावा या उद्देशाने हा उपवास केला जातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने शंकरदेवाला आपला पती बनवण्यासाठी हा उपवास केला. निर्जली उपवास असल्याने हा उपवास अतिशय कडक उपवास समजला जातो.जर याच दिवशी तुमच्या घरी लेकीचा जन्म झाला तर तिला देवी पार्वतीवरुन नाव द्या. ज्यामुळे कायम तिच्यावर देवी पार्वतीचा आणि हरतालिकेचा आशिर्वाद राहील. 


देवी पार्वतीची मुलींसाठी नावे 


  • 'अद्रिजा' नावाचा अर्थ "हिमालय किंवा पर्वतांची मुलगी" असा आहे. देवी पार्वतीचा जन्म हा पर्वतातून झाल्याची आख्यायिका आहे. 

  •  'अ' अक्षराने सुरू होणाऱ्या मुलींच्या नावांच्या यादीत खास नाव आहे'अक्षयिनी'. देवी पार्वतीला पुराणात 'अक्षयिनी' म्हणूनही ओळखले जाते.

  • 'गौरी', 'गिरीभू', 'गिरीजा' या नावाचा अर्थ पार्वती असा आहे.

  • 'गौरी' हे देवी पार्वतीचे अतिशय लोकप्रिय नाव आहे आणि गौरीचा अर्थ शुद्ध आणि तेजस्वी असा आहे.

  • 'गिरिभू' म्हणजे पर्वतातून जन्मलेली आणि 'गिरिजा' म्हणजे पर्वतातून जिचा जन्म झाला अशी ती.

  • 'ईशान्वी' हे देवी पार्वतीचे नाव मानले जाते. मुलीसाठी युनिक नावाचा विचार करत असाल तर हे नाव नक्की निवडा. 

  • 'ईशानी' हे देवी पार्वतीचे नाव आहे. जी भगवान शिवची पत्नी आहे आणि भगवान शिव यांना 'ईशान' देखील म्हटले जाते. 

  • 'नित्या' नावाचा अर्थ स्थिर आणि शाश्वत आहे.

  • 'प्रियंवदा' म्हणजे गोड आणि मृदू बोलणारा असा याचा अर्थ आहे. पण हे नाव पार्वतीच्या नावावरुन ठेवण्यात आलं आहे.

  • 'रिद्धी' हे देवी पार्वतीचे नाव आहे. रिद्धी हे नाव अतिशय सामान्य वाटत असलं तरीही गणरायाच्या पत्नींपैकी एकीचं नाव आहे. 

  •  भगवान शिव यांना रुद्र म्हणून देखील ओळखले जाते म्हणून त्यांच्या पत्नीचे नाव 'रुद्राणी' आहे. 

  • रुद्राचा अर्थ म्हणजे भगवान शिवाचा डोळा म्हणजे 'रुद्राक्षी'.

  • अपर्णा – तपश्चर्या करणाऱ्या स्त्रीला अपर्णा या नावाने हाक मारली जाते.

  • गौरी - माता पार्वतीला गौरी या नावानेही संबोधले जाते.

  • जया - विजयाचे प्रतीक असा या नावाचा अर्थ आहे. 

  • कौशिकी - हे नाव देवी पार्वतीचे प्रतीक आहे.

  • कृतिका - हे नाव समर्पणाचे प्रतीक आहे.

  • रुद्राणी - शिवाची पत्नी म्हणजेच माता पार्वती या नावाने ओळखली जाते.

  • शक्ती- दैवी स्त्रीलिंगी असा या नावाचा अर्थ आहे. 

  • शैलपुत्री - पर्वतांची कन्या असे देवी पार्वतीचे नाव मुलीसाठी निवडू शकता. 

  • अंबा - जगाची आई असा या नावाचा अर्थ आहे. थोडं हटके नाव म्हणून हे नाव निवडू शकता. 

  • अंबिका- जो मदत करते ती देवी पार्वती, मुलीसाठी निवडा हे नाव.