Baby Girl Names on Letter 'D' : शारदीय नवरात्रोत्सवाचा आजचा दुसरा दिवस. रविवारी घटस्थापना झाल्यानंतर सगळीकडे मंगलमय आणि प्रसन्न असं वातावरण आहे. देवी दुर्गेची मनोभावे या दिवसांमध्ये आराधना केली जाते. 15 ऑक्टोबर चे 23 ऑक्टोबरपर्यंत नवरात्र साजरी केली जाते. 24 ऑक्टोबरला दसरा आहे. या देवसांमध्ये देवी दुर्गेच्या अनेक रुपांची आराधना केली जाते. धार्मिक ग्रंथ आणि पुराणातील कथांमध्ये देवी दुर्गेच्या वेगवेगळ्या नावांचा उल्लेख केला जातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पालकांना कायम मुलांची नावे निवडताना हटके नावांचा विचार करतात. काही पालक खास एखाद्या आद्याक्षरावरून मुलींची नावे ठेवण्याचा विचार करतात. अशावेळी 'द' किंवा 'D' अक्षरावरून मुलीचे नाव ठेवण्याचा विचार करत असाल तर खालील नावे नक्कीच तुम्हाला मदत करतात. 


तसेच देवी दुर्गेच्या नावावरून मुलींची नावे ठेवलीत तर तुमच्या लेकीवर कायमच देवीचा कृपाशिर्वाद राहील. देवीच्या नावांमध्ये अनेक अर्थ लपले आहेत. त्यामुळे या नावांचा विचार तुम्ही नक्की करू शकता. 


'द' अक्षरावरून मुलींची नावे-अर्थ


  • देविशा - देवी दुर्गेसमान 

  • दाचयावी - देवी दुर्गेच एक नाव 

  • दक्षयानी - देवी दुर्गेचे नाव, एक रुप

  • दक्षिनया - देवी पार्वतीचे नाव 


'द' अक्षरावरून देवीची नावे 


  • दाक्षयणी - दाक्षयणी म्हणजे ‘दक्षाची कन्या.’ हिंदू पौराणिक कथेनुसार, देवी दुर्गा राजा दक्षप्रजापतीची कन्या सती म्हणून जन्मली.

  • ध्रिती हे नाव संस्कृतमधून आले आहे आणि याचा अर्थ ‘आनंदी’, ‘धैर्यवान’ आहे. हे देवी दुर्गाचे दुसरे नाव आहे, जी तिच्या भक्तांना धैर्य आणि आनंद देण्यासाठी ओळखली जाते.

  • धनलक्ष्मी - धनलक्ष्मीचा अर्थ संपत्तीची देवी आहे. धनलक्ष्मी हे लहान मुलीचे नाव असून ती मूळची भारतीय आहे. धनलक्ष्मी नावाच्या व्यक्ती प्रामुख्याने धर्मानुसार हिंदू असतात. 


देवीची नावे 


  • दक्षजा - देवीची लेक

  • दर्शिनी - देवीचा आशिर्वाद, पाहण्यासारखे 

  • देवेशी - देवी दुर्गा, मुख्य देवी

  • दिगंबरी - देवी दुर्गा, देवी दुर्गेचं रुप

  • दुर्गास्तुती - देवी दुर्गेची स्तुती, देवी दुर्गेचा आनंद 


देवीच्या नावांवरून मुलींची नावे 


  • देविका - छोटी देवी

  • दित्या - देवी लक्ष्मीचे दुसरे नाव 

  • दुती - देवी लक्ष्मी 

  • देविषा - देवी प्रमाणे, देवीचे रुप 


नवरात्रीमधील 'नवदुर्गा'


  • शैलपुत्री

  • ब्रह्मचारिणी

  • चन्द्रघंटा 

  • कूष्माण्डा 

  • स्कंदमाता 

  • कात्यायनी

  • कालरात्रि 

  • महागौरी


(फोटो सौजन्य - Freepik.com )