Bad Home Remedies For Skin: चेहऱ्याची योग्य काळजी घेतली नाही तर हळहळू त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. जर तुम्ही रोज मेकअप करत असाल तर रोज चेहऱ्याची नीट काळजी घ्यावी लागते. अन्यथा मेकअपमुळं त्वचेला नुकसान होण्याची शक्यता असते. अलीकडे बाजारात अनेक स्कीनकेअर प्रोडक्ट येत आहेत. काहींच्या त्वचेसाठी हे प्रोडक्ट योग्य ठरत नाही. त्यामुळं तरुणी घरगुती उपायांकडे वळतात. पण तुम्हाला माहितीये का किचनमधील काही पदार्थांमुळंही त्वचा खराब होऊ शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सतेज आणि निरोगी त्वचा मिळवण्यासाठी अनेक तरुणी प्रयत्न करत असतात. आयुर्वेदातही चमकदार त्वचेसाठी काही उपाय देण्यात आले आहेत. त्यानुसार तरुणी घरातील वस्तूंचा वापर करुन चेहऱ्यासाठी फेसपॅक किंवा स्क्रब करतात. त्याचबरोबर इंटरनेटवरही अनेक उपाय देण्यात येतात. मात्र, त्यातील काही उपाय मात्र आधारहिन आहेत. कारण या उपायांना ना वैज्ञानिक आधार असतो ना त्यावर काही संशोधन झालेले असते. त्यामुळं कोणतीही माहिती नसताना हे पदार्थ चेहऱ्यावर लावणे हानिकारक असू शकते. 


प्रत्येकाच्या त्वचेचा पोत वेगवेगळा असतो. अशावेळी इंटरनेटवरील उपाय प्रत्येकाच्या त्वचेला सूट होतील की नाही याची काहीच शाश्वती नसते. त्याचसाठी डर्माटोलॉजिस्ट यांनी पाच पदार्थांबाबत सांगितले आहे ते तुम्ही तुमच्या त्वचेवर कधीच वापरु नका. त्यामुळं त्वचेचे भयंकर नुकसान होऊ शकते. 


टॅन स्कीनवर बेसन


उन्हामुळं चेहरा खूप जास्त टॅन होतो. टॅन काढण्यासाठी अनेकदा बेसनचा स्क्रब म्हणून वापर केला जातो. मात्र बेसनचा अतिवापरामुळं त्वचा इरीटेट होऊ शकते. त्यामुळं टॅन स्कीनवर बेसनचा वापर करु नये. 


पर्याय काय?


त्वचेवरील टॅन हटवण्यासाठी बेसनच्याऐवजी टॉमेटोचा वापर करावा. टोमॅटोमध्ये लायकोपीन असते जे एक अँटीऑक्सिडेंट म्हणून काम करते. चेहऱ्यावर त्याचा वापर केल्यास जळजळण्याचीही शक्यता कमी होते. 


चेहऱ्यावर वॉलनट स्क्रब


स्किन एक्सफोलिएशनसाठी अनेकदा चेहऱ्यावर वॉलनट स्क्रबचा वापर केला जातो. मात्र यामुळं चेहऱ्याचे मॉडरेशन खराब होऊ शकते. याचे कण चेहऱ्यासाठी खूप जास्त हार्ड ठरु शकतात. त्यामुळं त्याचा वापर चेहरा साफ करण्यासाठी केला जाऊ नये. जर तुमची त्वचा संवेदनशील आणि कोरडी असेल तर याचा वापर करु नका. 


पर्याय काय?


तज्ज्ञांच्या मते, वॉलनट स्क्रबच्याऐवजी दह्याचा वापर करावा. यात लॅक्टिक अॅसिड असते ज्यामुळं त्वचेला फार नुकसान होत नाही. एक्सफोलिएशनसाठीही त्याचा उपयोग होतो. त्वचेला नुकसान न पोहोचवता हळूहळू डेड स्कीनपासून सुटका मिळवून देते. 


लिंबू आणि संत्रे


त्वचेची चमक वाढवण्यासाठी लिंबू किंवा संत्र्याचा वापर केला जातो. मात्र, ही रेमिडी फॉलो करणे नुकसानदायक ठरु शकते. या दोन्ही गोष्टींमुळं त्वचा जळजळ जाणवू शकते. लिंबू काही प्रमाणात सेन्सिव्हिटि वाढवू शकते. तसंच, सूर्याच्या संपर्कात येताच त्वचा काळी पडण्याची शक्यता अधिक आहे. 


पर्याय काय?


चमकदार त्वचेसाठी नियसिनमाइड किंवा व्हिटॅमिन सी सीरमचा वापर केला पाहिजे. यामुळं त्वचा चमकदार तर होतेच पण त्याचबरोबर तजेलदार होते.          


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)