Winter Season : हिवाळ्यात बऱ्याचदा सूर्यप्रकाश कमी असल्याने धुतलेले कपडे लवकर वाळत नाहीत. अशावेळी कपड्यांना कुबट वास येऊ लागतो आणि बुरशी देखील येते. तेव्हा कपडे सुकत घालण्यासाठी तुम्ही काही सोप्या ट्रिक्स वापरू शकता. 


कपडे धुतल्यानंतर लगेचच सुकत टाका : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कपड्यांना जर तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये धूत असाल तर स्पिनचा पर्याय देखील वापरा ज्यामुळे कपड्यातील जास्तीचं पाणी निघून जाईल. मग कपडे झटका आणि मग सुकायला ठेवा. तुम्ही घराच्या आत रश्शी बांधून कपडे सुकत टाकू शकता. ओले कपडे जास्त वेळ बादलीत ठेवल्याने कपड्यांना वास येतो.  


जिथे हवा खेळतो राहते अशी जागा निवडा : 


कपडे सुकवण्यासाठी अशी जागा निवडा जिथे खिडकी असेल आणि हवा खेळती राहील. यामुळे कपडे कोरडे होण्यास मदत होते. जिथे हवा खेळती राहत नाही अशा ठिकाणी कपडे वाळत घातल्यास ते सुकायला जास्त वेळ लागतो.


कपडे सुकवण्यापूर्वी टॉवेलमध्ये लपेटा : 


जर धुतलेले कपडे कमी असतील तर ते सुकवण्यासाठी तुम्ही टॉवेलचा वापर करू शकता. कपडे टॉवेलमध्ये ठेवा आणि ते रोल करा जेणेकरून कपड्यांमधील पाणी टॉवेलपर्यंत पोहोचेल. यानंतर, टॉवेलने कपडे काढा आणि ते कोरडे करा. अशामुळे कपडे लवकर कोरडे होतात.


रूम हिटर ठरू शकतो उपयोगी : 


कपडे सुकवण्यासाठी तुम्ही हिटरचा वापर करू शकता. हिटर बसवलेल्या खोलीत कपडे सुकण्यासाठी ठेवा, कपड्यांना उष्णता मिळेल आणि ते लवकर सुकायला लागतील.


हेही वाचा : गिधाडांची कमी होत जाणारी संख्या ठरली 5 लाख लोकांच्या मृत्यूस कारणीभूत, कारण काय?


 


हँगरवर कपडे सुकत घाला : 


कपडे सुकवण्यासाठी तुम्ही हँगरचा वापर करू शकता. हँगरवर ओले कपडे टांगून ते रश्शीवर सुकत टाकू शकता. अशामुळे कपड्यांना सर्व बाजूंनी हवा लागते आणि कपडे लवकर सुकण्यास मदत होते. 


हेअर ड्रायर येईल कामी :


लहान कपडे सुकवण्यासाठी तुम्ही हेअर ड्रायरचा वापर सुद्धा करू शकता. हेअर ड्रायर कपडे लवकर सुकतात आणि स्पॉट ड्रायिंगसाठी फायदेशीर आहे. (इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)