How to find out fake potatoes: आजकाल काही रुपयांच्या हव्यासापोटी लोक आपल्या आरोग्याशी खेळत आहेत. गेल्या काही वर्षांत अनेक पदार्थनामध्ये भेसळ केली जात आहे. अशा भेसळयुक्त मालाचा धंदा झपाट्याने वाढत आहे. विशेषत: सण जवळ आले की अनेक पदार्थ घरी बनवले जातात. यासाठी खूप सामान लागते. या खाद्यपदार्थात मोठ्या प्रमाणात भेसळ होते. आता बटाट्यातही भेसळ सुरू झाली आहे. होय, सध्या बाजारात नकली बटाटे विकले जात आहेत. या बटाट्यामध्ये अनेक प्रकारची रसायने मिसळली असून दुकानांमध्ये तो चढ्या भावाने विकला जात आहे. तुम्हीही बनावट बटाटे खरेदी करता का? कसं ओळखायचं चला जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतेच उत्तर प्रदेशातील बलिया येथे छाप्यात मोठ्या प्रमाणात बनावट बटाटे जप्त करण्यात आले आहेत. हा बटाटा ताजा आणि नवीन दिसण्यासाठी अनेक प्रकारची हानिकारक रसायने मिसळण्यात आली आहेत. त्यामुळे बटाटे खरेदी करण्यात लोकांची फसवणूक होत आहे.


कसे ओळखायचे नकली बटाटे?


  • खरा आणि नकली बटाटा वासावरून ओळखता येतो. जर बटाटा खरा असेल तर त्याला नैसर्गिक सुगंध येतो. तर बनावट बटाट्याला रसायनांचा वास येतो आणि त्यांचा रंग हाताला लागतो.

  • बटाटा कापून तपासावा. जर तो खरा बटाटा असेल तर तो आत आणि बाहेर जवळजवळ सारखाच रंगाचा असेल. तर बनावट बटाट्याचा रंग आतून वेगळा असेल. बटाट्यातील माती काढा आणि एक नजर टाका.

  • तिसरा मार्ग म्हणजे बटाटा पाण्यात बुडवून तपासणे. बनावट बटाटे पाण्यात तरंगू शकतात कारण त्यात काही रसायने असतात. तर वास्तविक आणि ताजे बटाटे पाण्यात बुडतात. 

  • नकली बटाट्यांवरील माती पाण्यात विरघळते, तर खऱ्या ताज्या बटाट्यांवरील माती अनेक वेळा घासूनही लवकर साफ होत नाही आणि त्याची सालही खूप पातळ असते जी माती काढल्यावरच निघते.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)