Beetroot Chips Recipe: मुलं बीटरूट खात नाहीत? मग त्यापासून बनवा चिप्स, झटपट होणारी रेसिपी जाणून घ्या
Easy Snacks Recipe: बीटरूट चिप्स खायला खूप चविष्ट असतात. मोठे ते अगदी लहान मुलंही आवडीने हे चिप्स खातात.
Hoe to Make Beetroot Chips: बीटरूट अनेक प्रकारे आरोग्यदायी भाजी आहे. ही भाजी शरीरासाठी अनेक आरोग्य फायदे देते. बीटरूटमध्ये फायबर, पोटॅशियम, लोह, फॉलिक ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखे पोषक तत्व आढळतात जे अशक्तपणा, वजन कमी करणे, पचन आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. पण लहान मुलं बीटरूट खात नाहीत. मग अशावेळी काही तरी आयडिया करून त्यांना ही पौष्टिक भाजी खायला घालणे गरजेचे आहे. तुम्ही बीटरूटपासून चिप्स बनवू शकता. चला याची सोपी आणि झटपट होणारी रेसिपी जाणून घेऊयात.
लागणारे साहित्य
बीटरूट - 2-3
ऑलिव्ह तेल - 2-3 चमचे
काळे मीठ - 1/2 टीस्पून
काळी मिरी - 1/2 टीस्पून
चाट मसाला- 1/2 टीस्पून
हे ही वाचा: Suji Mendu Vada Recipe: घरी बनवा झटपट मेदू वडा, रविवारचा नाश्ता होईल खास; जाणून रेसिपी
जाणून घ्या रेसिपी
सगळ्यात आधी बीटरूट पूर्णपणे धुवा आणि त्याची दोन्ही टोके कापून टाका. पुढे साल काढा आणि बीटरूटचे पातळ काप करा.
आता एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात बीटरूटचे काप ठेवा आणि ते चांगले धुवा जेणेकरून त्यातील अतिरिक्त स्टार्च निघून जाईल.
आता हे काप स्वच्छ कॉटनच्या कापडावर पसरवा आणि नीट वाळवा. लक्षात घ्या बीटरूट जितके कोरडे होईल तितके चिप्स कुरकुरीत होतील.
आता एका मोठ्या भांड्यात ऑलिव्ह ऑईल टाका आणि त्यात काळे मीठ, मिरपूड आणि चाट मसाला घालून चांगले मिक्स करा.
यानंतर या मसाल्याच्या तेलात बीटरूटचे तुकडे टाका आणि नीट कोट करा जेणेकरून प्रत्येक स्लाइसला मसाले चांगले चिकटतील.
आता ओव्हन १८० डिग्री सेल्सिअसवर प्री-हीट करा.
आता बेकिंग ट्रेला बटर पेपर लावा आणि त्यावर मसालेदार बीटरूटचे तुकडे एकामागून एक ठेवा.
काप एकमेकांच्या वर ठेवले जाणार नाहीत याची काळजी घ्या, जेणेकरून प्रत्येक चिप्स व्यवस्थित कुरकुरीत होतील.
बीटरूटचे तुकडे ओव्हनमध्ये 25-30 मिनिटे बेक करावे. मधूनमधून एकदा चिप्स पलटी करा म्हणजे दोन्ही बाजू समान शिजतील.
तुम्ही बीटरूट चिप्स एअर फ्राय किंवा डीप फ्राय देखील करू शकता. चहा, हिरवी चटणी किंवा तुमच्या आवडत्या डिपसोबत सर्व्ह करा.