How to make Dahi Vada: हिंदू धर्मात करवा चौथ या सणाला खूप महत्त्व आहे. महाराष्ट्रात जसं वट पौर्णिमा असते तसेच उत्तर भारतात करवा चौथ असतो.  हा सण विवाहित महिलांसाठी हा एक महत्त्वाचा सण आहे. या सणाला विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास ठेवतात. यंदा करवा चौथ हा सण 20 ऑक्टोबरला साजरा होणार आहे. या काळात महिला दिवसभर काहीही न खाता-पिता निर्जला व्रत करतात आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. यानंतर रात्री चंद्र पाहून उपवास तोडला जातो. अशा स्थितीत रात्री उपवास सोडताना काहीतरी चटपटीत खाण्याची तल्लफ होते. जर तुम्हालाही उपवास सोडल्यानंतर काहीतरी गोड-आंबट खावेसे वाटत असेल, तर तुम्ही हा दही-वडा करू शकता. याचसाठी आज आम्ही तुम्हाला दही वडा बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. 


वडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य 


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    1 वाटी उडीद डाळ

  • 1-2 हिरव्या मिरच्या (बारीक चिरून)

  • 1 इंच आले (किसलेले)

  • चवीनुसार मीठ

  • तळण्यासाठी तेल


गार्निशिंग साठी लागणारे साहित्य 


  • 2 कप दही (फेटलेले)

  • 1-2 टीस्पून चाट मसाला

  • 1-2 टीस्पून लाल तिखट

  • 1-2 चमचे चिंचेची चटणी

  • ताजी कोथिंबीर (चिरलेली)

  • डाळिंबाचे दाणे (पर्यायी)

  • चवीनुसार मीठ


जाणून घ्या कृती 


  • सगळ्यात आधी, उडीद डाळ धुवा आणि सुमारे 4-6 तास किंवा जमल्यास रात्रभर पाण्यात भिजवा.

  • आता भिजवलेलय उडीद डाळमधून पाणी काढून घ्या आणि मऊ पेस्ट बनवा. पेस्टमध्ये आवश्यक असल्यास, थोडे पाणी घाला.

  • नंतर या पेस्टमध्ये हिरवी मिरची, आले आणि मीठ घालून मिक्स करा.

  • यानंतर, एका कढईमधे  तेल छान गरम करा.

  • गरम तेलात पेस्टचे हळू हळू वडे सोडा आणि सोनेरी तपकिरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.

  • तळल्यावर वड्यांना मऊ होण्यासाठी सुमारे 15-20 मिनिटे गरम पाण्यात भिजवा.

  • वड्यांमध्ये मध्ये असलेले अतिरिक्त पाणी काढून टाकण्यासाठी त्यांना हलक्या हाताने दाबा.

  • आता वडे सर्व्हिंग बाऊलमध्ये ठेवा आणि त्यावर फेटलेले दही घाला.

  • यानंतर चाट मसाला, लाल तिखट आणि मीठ शिंपडा आणि वरून चिंचेची चटणी घाला.

  • शेवटी चिरलेली कोथिंबीर आणि डाळिंबाच्या दाण्यांनी सजवा आणि सर्व्ह करा.