How to make Gulab Jamun: कोणत्याही सणात गोड पदार्थ तर पाहिजेच. मिठाई शिवाय सण साजरा होतंच नाही. आता भारतातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळीचा सण येत आहे. दिवाळी यावर्षी 31 ऑक्टोबर पासून साजरी केली जाणार आहे. लक्ष्मी पूजनाला लोक दिवे लावून लक्ष्मीची पूजा करतात. या दिवशी मिठाईचे विशेष महत्त्व आहे. यासाठी तुम्हाला बाजारातून मिठाई आणण्याची गरज नाही. तुम्ही चविष्ट गुलाब जामुन घरीही बनवू शकता. घरी छान सॉफ्ट  गुलाब जामुन बनवण्यासाठी आम्ही देत असलेली रेसिपी फॉलो करा. चला जाणून घेऊयात गुलाब जामुन बनवण्याची सोपी रेसिपी... 


गुलाब जामुनसाठी लागणारे साहित्य 


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    मावा - 250 ग्रॅम

  • छेना - 100 ग्रॅम

  • मैदा- 4 टेस्पून

  • बेकिंग पावडर - 1/2 टीस्पून

  • दूध - 2-3 चमचे (आवश्यकतेनुसार)

  • तेल - तळण्यासाठी


पाक बनवण्यासाठी लागणारे साहित्य 


  • साखर - २ कप

  • पाणी - 1 कप

  • वेलची - २-३

  • केशर धागे - काही

  • गुलाब पाणी - 1 टेबलस्पून


जाणून घ्या कृती 


  • सर्वप्रथम एका पातेल्यात साखर आणि पाणी घेऊन गॅसवर ठेवा. साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर त्यात वेलची आणि केशर घाला. पाक स्ट्रिंग सिरप प्रमाणे घट्ट करा. गॅस बंद करून पाक थंड होऊ द्या.

  • एका भांड्यात मावा आणि छेना घ्या आणि चांगले मिसळा. त्यात मैदा आणि बेकिंग पावडर घालून मिक्स करून हलक्या हाताने चांगले मळून घ्या.

  • मळलेल्या पिठाचे छोटे गोळे बनवा. गुलाब जामुनमध्ये तुम्ही काजू, बदाम किंवा पिस्ता यांसारखे ड्राय फ्रूट्स देखील घालू शकता. हे गोळे गरम तेलात मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत तळा.

  • तळलेले गुलाब जामुन गरम पाकात टाका. ते पाका मध्ये किमान 2 तास राहू द्या जेणेकरून गुलाब जामुन पाक योग्य प्रकारे शोषून घेतील. 



'या' गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा


  • मावा आणि खवा नीट मळून घ्या म्हणजे गुलाब जामुन मऊ होतील.

  • तेल जास्त गरम करू नका, गुलाब जामुन फक्त मंद आचेवर तळून घ्या.

  • सरबत घट्ट करू नका, सरबत एक धागा पुरेसा असेल.

  • गुलाब जामुन किमान २ तास पाकामध्ये ठेवा.