Easy Kadhi Pakora Recipe: उत्तर भारतात करवा चौथचा सण साजरा केला जातो. करवा चौथ हा एक अतिशय पवित्र सण आहे, ज्यामध्ये विवाहित स्त्रिया त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. या दिवशी सर्गीने व्रत सुरू होते आणि संध्याकाळी चंद्राला अर्घ्य अर्पण करून उपवास सोडला जातो. उत्तर भारतात भाताबरोबर कढी खाणे खूप पसंत केले जाते. करवा चौथ (karwa chauth 2024) सारख्या विशेष प्रसंगी कढी बनवणे हा परंपरेचा भाग बनला आहे. अशा परिस्थितीत घरच्या घरी स्वादिष्ट कढी कशी बनवायची हे देखील जाणून घ्यायचे आहे का? चला आज आम्ही तुम्हाला कढीची रेसिपी सांगणार आहोत.


कढीसाठी लागणारे साहित्य 


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बेसन - 1 वाटी

  • दही - 1 कप

  • पाणी - 4 कप

  • हल्दी पावडर - 1/2 टीस्पून

  • लाल मिरची पावडर - 1/4 टीस्पून

  • हिंग - एक चिमूटभर

  • जिरे- 1 टीस्पून

  • मोहरी - 1/2 टीस्पून

  • कढीपत्ता - 8-10

  • मीठ - चवीनुसार

  • तेल- तळण्यासाठी


पकोडा बवण्यासाठी लागणारे साहित्य 


  • बेसन - 1/2 कप

  • कांदा - 1 चिरलेला

  • हिरवी मिरची - 2 चिरून

  • कोथिंबीर - चिरून

  • मीठ - चवीनुसार

  • पाणी - गरजेनुसार


जाणून घ्या कृती 


  • सर्व प्रथम एका भांड्यात बेसन, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि मीठ घालून मिक्स करा.

  • नंतर थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ बनवून घ्या.

  • आता कढईत तेल गरम करा आणि त्यात लहान लहान पकोडे बनवून छान सोनेरी होईपर्यंत तळा.

  • नंतर एका पातेल्यात दही आणि पाणी घालून चांगले फेटून घ्या.

  • त्यात हळद, तिखट, हिंग, जिरे आणि मीठ घालून मिक्स करा.

  • आता गॅसवर दुसरी कढई ठेवा आणि त्यामध्ये हे दह्याचे मिश्रण घाला. मध्यम आचेवर शिजवा. सतत ढवळत राहा. हवं तेवढं पाणी घाला. 

  • हे मिश्रण उकळायला लागल्यावर त्यात बेसन घालून मिक्स करा. ते घट्ट होईपर्यंत शिजवा.

  • यानंतर कढईत तळलेले पकोडे घालून मंद आचेवर ५-७ मिनिटे शिजवा.

  • शेवटी गरमागरम कढी भात किंवा चपातीसोबत सर्व्ह करा.