How to make soft roti: भारतीय स्वयंपाक घरात चपाती हा फारच बेसिक पदार्थ आहे. एक वेळेला तरी चपाती खाल्लीच जाते. अनेकांनाच चपाती शिवाय जेवण पूर्ण होत नाही. पण अजूनही अनेकांकडून चपाती नीट बनवली जात नाही. मऊ, लुसलुशीत चपाती बनवणे सहज शक्य आहे. पण तरीही अनेकनाच्या चपात्या कडक होतात. गॅसवर ठेवल्यावर चपाती छान टम्म फुगतही नाही. अशावेळी तुम्ही टेन्शन घेऊन नकात. आम्ही तुमच्यासाठी खास टिप्स घेऊन आलो आहोत. ज्यामुळे तुम्ही चपाती बऱ्याच वेळ ठेवल्यानंतरही कडक होणार नाही. याशिवाय चपाती मऊ, लुसलुशीत आणि टम्म फुगेल. 


'या' टिप्स फॉलो करा 


> चपाती छान बनण्यासाठी कणिक फार महत्त्वाची असते. पीठ छान मळल्यावरच चपाती मऊ आणि चांगली बनते. चपाती बनवण्यासाठी प्रथम पीठ मळून घ्या आणि सेट होण्यासाठी किमान 15 मिनिटे ठेवा. लक्षात घ्या चपातीचे पीठ जास्त पातळ किंवा घट्ट नसावे.
> कणकेला सेट होण्यासाठी, ते प्लेट किंवा कापड किंवा गुंडाळून ठेवा. यामुळे चपातीचे पीठ चांगले सेट होईल. 
> नंतर कणिकेचे छोटे गोळे करा आणि एक एक करून चपाती लाटायला सुरुवात करा. 
>  लक्षात ठेवा की चपाती लाटताना फार कमी कोरडे पीठ वापरू नका. चपातीला किमान दोनदा कोरडे पीठ लावा आणि छान लाटून घ्या.
> आता चपाती भाजण्यासाठी गरम तव्यावर ठेवा आणि अगदी हलकी शिजल्यावरच पाळता. दुसऱ्या बाजूने थोडी जास्त भाजा.  
> नंतर दोन्ही बाजूने अर्धी चपाती शिजल्यावर हलकीशी सगळ्या बाजूने दाबा. यामुळे चपाती छान टम्म फुगेल.  
> अशा प्रकारे भाजलेली चपाती बराच काळ मऊ राहते. चपाती तूप लावून गरम भांड्यात ठेवा. तुमची चपाती दिवसभर मऊ राहील.