How to Make Tomato Khajoor Chutney: भारतीय जेवणात वेगवेळ्या चटण्यांचा समावेश असतो. अनेकांचं जेवणच याशिवाय पूर्ण होत नाही. चटणी जेवणाचा आनंद द्विगुणित करतो. तुम्ही शेंगदाणा, खोबरं अशा अनेक  प्रकारच्या चटण्या खाल्ल्या असतील. पण तुम्ही कशी टोमॅटो आणि खजुराची चटणी बनवली आहे? होय, टोमॅटो आणि खजुराची चविष्ट मसालेदार चटणी बनवता येते. ही चटणी विशेषतः बंगालमध्ये बनवली जाते. ही चटणी एवढी टेस्टी लागते की लहान ते मोठे सगळेच आवर्जून या चटणीचा आस्वाद घेतील. विशेष म्हणजे ही चटणी तुम्ही 10-15 दिवस स्टोअर करून ठेवू शकता. चला जाणून घेऊयात टोमॅटो आणि खजुराची चटणी कशी बनवायची.


लागणारे  साहित्य 


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    टोमॅटो (250 ग्रॅम)

  • खजूर ( 7-8) 

  • तेल 

  • मोहरी 

  • जिरे 

  • मेथी 

  • बडीशेप किंवा कलोंजी 

  • लाल मिरच्या 

  • साखर 


कशी बनवायची चटणी? 


  • सर्वात आधी 250 ग्रॅम पिकलेले लाल टोमॅटो घ्या. टोमॅटोला छान धुवून घ्या. टोमॅटो धुवून वरच्या बाजूला 4 कट करा. लक्षात घ्या टोमॅटोला खालीपर्यंत कट करू नकात. 

  • आता 7-8  खजूर घ्या. खजूरमधील बिया काढून टाका आणि लांबीच्या दिशेने कापून घ्या. 

  • आता एका पातेल्यात पाणी उकळून त्यात टोमॅटो घालून झाकण ठेवून मंद आचेवर ५ मिनिटे शिजवा. 

  • पाणी थंड झाल्यावर टोमॅटो काढा आणि साल काढा. संपूर्ण टोमॅटोची साल सहज निघून जाईल. आता टोमॅटोचे जाड तुकडे करा.

  • आता एक कढईत घ्या आणि त्यात २ चमचे तेल घाला. आता तेलात मोहरी, जिरे, मेथी, नायजेला आणि बडीशेप घाला. थोडा वेळ शिजवून घ्या आणि नंतर त्यात 2 पूर्ण कोरड्या लाल मिरच्या घाला.

  • आता चिरलेला टोमॅटो घाला आणि नंतर वरून मीठ घाला. झाकण ठेवून मध्यम आचेवर टोमॅटो २ मिनिटे शिजवा. टोमॅटो शिजल्यावर ते हलके मॅश करा आणि 100 ग्रॅम साखर मिसळा. आता त्यात खजूर घाला. 

  • आता ही चटणी झाकण ठेवून ४ मिनिटे शिजवा. गॅस बंद करा आणि थंड झाल्यावर चटणी बाहेर काढा.

  •  ही चटणी पराठा किंवा भातासोबत खा. 

  •  10-15 दिवस रेफ्रिजरेटरमध्ये तुम्ही ही चटणी स्टोअर करून सहजपणे ठेवू शकता.