भेसळयुक्त हिंग कसं ओळखायचं? फक्त 4 टिप्स वापरा लगेच कळेल
हिंगाच्या सेवनाने जेवढा फायदा आरोग्याला मिळतो तेवढेच नुकसान भेसळयुक्त हिंगाच्या सेवनाने होऊ शकतं. तेव्हा भेसळयुक्त हिंग कसं ओळखायचं हे जाणून घेऊयात.
How to identify fake asafoetida : स्वादिष्ट जेवण बनवण्यासाठी त्यात वापरण्यात आलेलं हिंग हे जेवणाचा स्वाद वाढवण्यासोबतच आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर मानलं जातं. हिंग व्यक्तीला अनेक आजारांपासून वाचवण्याचे काम करते. मात्र हिंगाच्या सेवनाने जेवढा फायदा आरोग्याला मिळतो तेवढेच नुकसान भेसळयुक्त हिंगाच्या सेवनाने होऊ शकतं. तेव्हा भेसळयुक्त हिंग कसं ओळखायचं हे जाणून घेऊयात.
भेसळयुक्त हिंग ओळखण्यासाठी वापरा 4 टिप्स :
जाळून पाहा :
भेसळयुक्त हिंग खाल्ल्याने आरोग्याला अपाय पोहोचू शकतो. तेव्हा हिंग हे भेसळयुक्त नाही ना हे ओळखण्यासाठी ते जाळून पाहा. जर ते भेसळयुक्त हिंग नसेल तर ते जाळल्यावर अधिक चमकदार होऊ शकेल. तसेच हिंग जर भेसळयुक्त असेल तर ते सहज जळत नाही.
रंगावरून ओळखा :
भेसळयुक्त हिंगाची ओळख तुम्ही रंगावरून सुद्धा करू शकता. हिंगाचा खरा रंग हा हलका तपकिरी असतो, जर हे हिंग तुपात मिसळल्यास फुलते आणि त्याचा रंग लाल होतो. पण असं होत नसेल तर तुम्ही समजून जा की खरेदी केलेलं हिंग हे भेसळयुक्त आहे. पाण्यात टाकल्यावर हिंग विरघळते आणि पाण्याप्रमाणे रंग घेते. मात्र भेसळयुक्त हिंग असल्यास त्यात कोणताही बदल दिसून येत नाही.
हेही वाचा : काही ट्रेन लाल आणि काही निळ्या का असतात? यात फरक काय?
सुगंधावरून ओळखा :
हिंगचा वास हा खूप स्ट्रॉंग असतो. जर तुम्ही हिंगाला साबण लावून धुतले तरी त्याचा सुगंध हा लवकर जात नाही. त्याउलट जर नकली हिंग असेल तर त्याचा सुगंध हा लवकर निघून जातो. जर हिंगाचा सुगंध फार लवकर निघून गेला तर समजा ते हिंग भेसळयुक्त आहे.
असं ओळखा भेसळयुक्त हिंग :
भेसळयुक्त हिंगामध्ये अधिकतर दगड किंवा साबणाची भेसळ केलेली असते. तेव्हा हे ओळखण्यासाठी एक चमचा हिंग घेऊन एक ग्लास पाण्यात मिक्स करा. काहीवेळ हिंग ग्लासात तसंच राहू द्या. जर हिंग भेसळयुक्त असेल तर त्यातील दगडाचे किंवा साबणाचे कण तुम्हाला पाण्याच्या तळाशी दिसून येतील. तसेच जर हिंगात भेसळ नसेल तर तुम्हाला काहीच दिसणार नाही.