काही ट्रेन लाल आणि काही निळ्या का असतात? यात फरक काय?

भारतात रेल्वे वाहतुकीचं जाळ खूप मोठं आहे. प्रवास करताना आपल्याला लाल आणि निळ्या रंगाच्या पॅसेंजर ट्रेन पाहायला मिळतात. मात्र तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की या दोघांमध्ये नेमका फरक काय असतो? 

Updated: Aug 23, 2024, 06:35 PM IST
काही ट्रेन लाल आणि काही निळ्या का असतात? यात फरक काय? title=
(Photo Credit : Social Media)

Red and Blue Train Difference In India : भारतात रेल्वे वाहतुकीचं जाळ खूप मोठं आहे. प्रवास करताना आपल्याला लाल आणि निळ्या रंगाच्या पॅसेंजर ट्रेन पाहायला मिळतात. मात्र तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की या दोघांमध्ये नेमका फरक काय असतो? भारतात रेल्वे रुळांवर धावणाऱ्या लाल आणि निळ्या रंगाच्या ट्रेनबद्दल जाणून घेऊयात. 

ट्रेनचे कोच दोन प्रकारे बनलेले असतात : 

तुम्ही पाहिलं असेल की काही ट्रेनचे कोच हे निळ्या रंगाचे असतात तर काही लाल रंगाचे असतात. ट्रेन कोचच्या रंगातील हे अंतर कोचचे प्रकार दर्शवतात. ट्रेनमधील निळ्या रंगाच्या कोचना ICF कोच म्हणजेच इंटीग्रल कोच फॅक्ट्री (Integral Coach Factory) असे म्हणतात. तर लाल रंगाच्या कोचला LHB म्हणजे लिंक हॉफमैन बुश (Linke Hofmann Busch) असं म्हणतात. या दोन कोचचा रंगचं  वेगळा नसतो तर यांच्यातील फॅसिलिटी सुद्धा वेगळ्या असतात. 

इंटीग्रल कोच फॅक्ट्री म्हणजे नक्की काय? 

इंटीग्रल कोच फॅक्ट्रीचा कारखाना हा तामिळनाडूमधील चेन्नईमध्ये आहे, जिथे निळ्या रंगाचे रेल्वे कोच तयार केले जातात. या कोच फॅक्ट्रीची स्थापना देश स्वातंत्र आल्यावर 1952 मध्ये झाली होती. इंटीग्रल कोच फॅक्ट्री जे निळ्या रंगाचे कोच बनवते ते लोखंडाने बनवलेले असतात. या कोचमध्ये एयर ब्रेकचा वापर केला जातो. या रेल्वे कोचची मॅक्सिमम पर्मिसिबल गति 110 किलोमीटर प्रति तास इतकी असते. 

निळ्या रंगाच्या कोचमधील स्लीपर क्लासमध्ये 72 सीट्स असतात. एसी ३ क्लासमध्ये ६४ सीट्स असतात. इंटीग्रल कोच फॅक्ट्रीमध्ये बनलेल्या कोचला 18 महिन्यांमध्ये एकदा पीरियाडिक ओवरहॉलिंग करण्याची गरज भासते. त्यामुळे या ट्रेनच्या मेंटेनन्समध्ये जास्त खर्च येतो. या कोचचा राईड इंडेक्स 3.25 आहे. हे कोच एकमेकांशी डुअल बफर सिस्टम द्वारे जोडलेले असतात.  दुर्घटनेच्या वेळी हे ट्रेन कोच एकमेकांवर चढण्याची भीती असते. ज्यामुळे अपघाताची तीव्रता वाढू शकते. 

 हेही वाचा : World Vadapav Day 2024 : ..असा लागला वडापावचा शोध! मुंबईत कुठे मिळतील बेस्ट वडापाव?

लिंक हॉफमॅन बुश : 

लिंक हॉफमॅन बुश हा 2000 साली जर्मनीमधून भारतात आणला गेला होता. हे कोच बनवण्याची फॅक्ट्री पंजाबच्या कपूरथला येथे आहे. या प्रकारचे कोच हे स्टेनलेस स्टीलपासून बनवले जातात. यात डिस्क ब्रेकचा वापर केला जातो. हा कोच सेंटर बफर काउलिंग सिस्टम पासून लिंक असतो जेणेकरून अपघाताच्या वेळी हे कोच एकमेकांच्या वर चढत नाही. या कोचला 24 महिन्यांच्या आत ओवरहॉलिंगची गरज असते. त्यामुळे या कोचच्या मेन्टेनन्सवर कमी खर्च होतो. याचा राइडर इंडेक्स 2.5–2.75 आहे. या कोचची मॅक्सिमम पर्मिसिबल स्पीड ही 200 किलोमीटर प्रति तास असते आणि ऑपरेशनल स्पीड 160 किलोमीटर प्रति तास इतकी असते. या कोचच्या स्लीपर क्लासमध्ये 80 सीट्स असतात तर एसी ३ क्लासमध्ये 72 सीट्स असतात. 

कोणता कोच जास्त चांगला? 

LHB कोच ICF कोचच्या तुलनेत 1.7 मीटर मित्र जास्त लांब असते. हेच कारण आहे की त्यात बसण्यासाठी जास्त जागा असते. लाल रंगाच्या एलएचबी कोच कोचची स्पीड फास्ट असते. तसेच ते स्टेनलेस स्टील पासून बनलेले असतात त्यामुळे त्यांचे वजन कमी असते. दुर्घटना किंवा अपघाताच्या वेळी लाल रंगाचे कोच हे निळ्या रंगाच्या कोचच्या तुलनेत सुरक्षित असतात.