AC, कुलर न घेता भर उन्हाळ्यातही घर कसं राहील थंडगार? जाणून घ्या उपाय
Summer Tips : उन्हाळा म्हटला की, अंगाची लाही लाही होते. या गरमीमध्ये एक सेकंद पण राहिला होत नाही. अशामध्ये आपण कुलर आणि एसी लावतो. पण हे न लावता आपण घर थंड ठेवू शकतो. ते कसं तर हे साधे उपाय तुम्हाला सांगणार आहोत.
How will the house stay cool even in summer : दिवसेंदिवस उन्हाळ्याचा तडाखा वाढत आहे. अशात घराबाहेर काय घरातही राहतही राहणे सोप नाही. अंगाची लाही लाही होत असताना फॅन काय, एसी किंवा कुलरशिवाय पर्याय नाही. पूर्वी मातीची घरं असायची ती उष्णेतापासून आपल्या बचाव करायची शिवाय घर थंडही ठेवायची. आता सिंमेटच्या जंगलात घरात गारवा राहणं शक्य नाही. अशात मार्केटमध्ये एसी आणि कुलरचे अनेक पर्याय आले आहेत जे महाग असतात. उन्हाळ्यात एसी आणि कुलरच्या किंमती गगनाला भिडतात. अशात सर्वसामान्यांना एसी घेणं परवडत नाही. मग घर थंड कसं ठेवणार त्यासाठी सोपे आणि साधे उपाय तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. (How will the house stay cool even in summer without AC cooler Know the solution)
घरात थोडे फार बदल आणि काही गोष्टी केल्यास घरात गारवा राहतो. तुमचं घरात येणारे पाहुणेही म्हणतील की, घर असावं तर असं. घरात कोणते बदल करायला पाहिजे ज्यामुळे घर थंड राहिल जाणून घ्या.
अनेक घरात गडद रंगाचे पडदे, बेडशीट, सोफाकव्हर वापरले जातात. तुम्हीही गडद रंगाचे पडदे, बेडशीट, सोफाकव्हर वापरत असला तर ते पावसाळा सुरु होईपर्यंत ठेवून द्या. त्याऐवजी नाजूक नक्षी आणि फिक्या रंगाचे पडदे, बेडशीट आणि सोफा कव्हर वापरा.
त्याशिवाय उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घरात इनडोअर प्लांट्स लावा. हॉलमधील कोपऱ्या, खिडकी, टिपॉयवर हिरवेगार आणि सुंदर असे इनडोअर प्लांट्स ठेवा. त्यामुळे घरातील वातावरण थंड राहण्यास मदत मिळते.
उन्हाळ्याच्या दिवसात मोगरा, मधुमालती, मधुकामिनी ही सुंगधी फुले मार्केटमध्ये सहज मिळतात. ही फुलं घरातील टिपॉयवर एका भांड्यात पाणी भरुन फॅन किंवा कुलरजवळ ठेवा. यामुळे घरातील हवा थंड आणि सुगंधीत राहण्यास फायदा होते.
जर तुमच्याकडे कुलर असेल तर एका भांड्यात बर्फ घ्या आणि ते कुलर समोर ठेवा. यामुळे घर थंड होईल.
दुपारी 1 ते 5 यादरम्यान उन्हाची तिव्रता खूप वाढते अशावेळी दारं- खिडक्या बंद ठेवा. त्यामुळे घरात उष्णता राहणार नाही आणि घर थंड राहील.
तुमच्या घरातील ज्या खिडकी किंवा बाल्कनीतून जास्त प्रमाणात ऊन येत असेल तर तिथे तुम्ही हिरवा रंगाचा पडदा लावा. त्याशिवाय हा हिरवा पडदा पाण्याने ओला करा. त्यामुळे घरात गारवा राहिल.
असंच तुम्ही कुलर किंवा फॅन समोर ओला कपडा ठेवल्यास थंड हवा मिळेल.