Baby Girl Names on Swami Samarth : श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज श्रीदत्तात्रयांचे अवतार मानले जातात. आज गुरूवार.. या निमित्ताने अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या नावावरून ठेवा मुलींची नावे. महत्त्वाचं म्हणजे या मुलींच्या नावात स्वामींची विशेष कृपादृष्टी असणार आहे. 'श्री' वरून सुरू होणारी मुलींची नावे आणि त्याचा अर्थ. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असंख्य लोकं आज स्वामींची आराधना करतात. त्यांना कायम वाटतं की, आपल्या कुटुंबावर स्वामींचा कृपार्शिवाद असावा. अशावेळी त्यांनी आपल्या मुलींना स्वामींच्या नावावरून नावे द्यावीत. या नावांमध्ये स्वामींचा आर्शिवाद आहे एवढंच नव्हे तर सतत स्वामींचं स्मरण राहील. 


अक्कलकोट येथे श्री स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. तेथून पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तप:साधना केली. बालोन्मत्तपिशाच्चवृत्तीचे ते सिद्ध पुरुष होते. आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेकविध लीला केल्या. राजापासून रंकापर्यंत अनेकांवर प्रेमाचा वर्षाव केला. श्री स्वामी समर्थांची कांती दिव्य, तेज:पुंज होती. शरीराचा वर्ण गोरा होता. 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे' हा अत्यंत आश्वासक आणि आशादायी मंत्र त्यांनी समाजाला दिला आहे. अशक्यही शक्य करतील स्वामी, अशी स्वामी भक्तांची अनन्य श्रद्धा आहे. केवळ 'श्री स्वामी समर्थ' असा नामोच्चार केला, तरी एक वेगळी सकारात्मकता मिळते.अशावेळी तुमच्या मुलांची नावे तुम्हाला सतत स्वामी स्मरणात ठेवतील. 


स्वामींच्या नावावरून मुलींची नावे


श्रीजा - संपत्ती 
श्रीनिथी - लक्ष्मी
श्रीशा - फुल
श्रीजनी - सर्जनशील 
श्रीकिर्ती - श्रींची किर्ती 
श्रीना - रात्र 
श्रिस्ती - निर्मिती 
श्री - घरातील लक्ष्मी 
श्रीअंबा - अंबामातेचे नाव
श्रीकांता - सुंदर शरीराची 


मुलींची नावे आणि अर्थ


श्रीदेवी - शोभेची देवता 
श्रीपन्ना - कमळ फूल 
श्रीप्रभा - श्रींची प्रभा 
श्रीनंदा - श्रींचीं कन्या 
श्रीमुग्धी - मंत्रमुग्ध असलेली 
श्रीरुपा - श्रीकृष्णाची राधा 
श्रीरेखा - श्रींचा आर्शिवाद
श्रीरंजना - श्रींना रंजवणारी 
श्रीविद्या - श्रींची विद्या 
श्रीहर्षा - श्रींचा आनंद