निसर्गाच्या सानिध्यात व गोंगाटापासून दूर; जोडप्यांना खुणावताहेत ही Honeyemoon Destinations
Best Honeyemoon Destinations: हनीमूनसाठी शांततेत व निसर्गरम्य ठिकाणी जायचा प्लान आखताय का? आता या आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय एक नवी आयडिया
Best Honeyemoon Destinations: नवीन जोडप्यांसाठी हनीमूनचा काळ हा सर्वोत्तम असतो. सहजीवनाची सुरुवात करताना एकमेकांना समजून घेणेही महत्त्वाचे असते. त्यामुळं हनीमूनसाठी लोकेशन शोधताना पती-पत्नी यां दोघांनाही वेळ मिळेल असंच शोधावे लागते. पहिले हनिमुनसाठी हिल स्टेशन किंवा समुद्र किनारे यांना पहिली पसंती दिली जायची. मात्र आता नवीन ट्रेंड आला आहे. अलीकडेच जंगल सफारीची क्रेझ वाढत चालली आहे. नवीन लग्न झालेले जोडपे हनीमून साजरा करण्यासाठी जंगल निवडत आहेत. भारत पर्यटन 2022च्या आकडेवारीनुसार, आता जास्तीत जास्त पर्यटक फिरण्यासाठी निसर्गाला प्राधान्य देत आहेत. यात तरुणांचा समावेश अधिक आहे. शांततेत व मनशांतीसाठी तरुणांची पावले निसर्गाकडे वळत आहेत. भारतातील जंगल पर्यटनाबाबत जाणून घेऊया.
नवविवाहित जोडपे त्यांच्या नात्याची सुरुवात सुंदर क्षणांनी करतात. त्यासाठी ते अशा ठिकाणी फिरायला जातात जिथे त्यांना एकमेकांना समजून घेण्यास व शांतता असेल तिथे जातात. जेणेकरुन एकमेकांना खूप चांगला वेळ देऊ शकतील. त्यामुळं जास्तीत जास्त लोक उत्तराखंड येथील जिम कॉर्बेटला जाण्याचा प्लान आखतात. प्रदूषण, धावपळ, गोंगाटापासून ते छान क्षण व्यतित करु शकतात. जिम कॉर्बेट जंगलानजीक अनेक निसर्गसंपन्न रिसॉर्ट उभारण्यात आले आहेत.
जंगल सफारीचा वाढता ट्रेंड
हनीमूनच्या आठवणी नेहमी ताज्या ठेवण्यासाठी कपल्स ट्रेकिंग, एलीफेंट राइड, बोटिंग, जंगल सफारीसारख्या नैसर्गिक अॅक्टिव्हिटी करण्यास पसंत करतात. लग्नातील धावपळीनंतर छान रिलॅक्स होण्यासाठी लोक निसर्गाच्या सानिध्यात येतात.
इको टुरिजम
गोवा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तराखंड यासारख्या देशातील अनेक भागात इको टुरिजमला चालना मिळत आहेत. निसर्गाने वेढलेल्या ठिकाणी राहून सुट्टीचा आनंद घेतला जातो. किंवा अनेक ठिकाणी रिसॉर्टच्याच आजूबाजूला गावासारखी बांधणी केलेली असते. हायटेक सुविधा आणि गावाचा फिल, जवळच शेती व आजूबाजूला असलेली गर्द झाडी या नजारा काही औरच असतो. त्यामुळं जंगल रिसॉर्ट हे पर्यटकांची पहिली पसंत बनली आहे. अनेक रिसॉर्ट इको टुरिजमला चालना देत आहेत. तरुणांमध्येही याची मागणी वाढली आहे. काबिनी, दुधवा, जिम कॉर्बेट, नागरहोल, सातपुडा, ताडोबा आणि कान्हा राष्ट्रीय उद्यानाची मागणी वाढली आहे. आता हनिमुनसाठी गोवासारख्या ठिकाणी जाण्यापेक्षा मध्यप्रदेश किंवा जिम कॉर्बेटच्या जंगलात जाण्यास अधिक प्राधान्य दिले जाते.