लिंबाची सालं फेकून देऊ नका, किचनमध्ये साफ-सफाईसाठी असा करा वापर
Kitchen Cleaning With Lemon Peels: लिंबाच्या सालांचा वापर तुम्ही किचनमधील साफ-सफाईच्या कामांसाठीही करु शकता. त्यासाठी काय करावे, जाणून घ्या
Kitchen Cleaning With Lemon Peels: लिंबाच्या रसाचे फायदे तर तुम्हाला माहितीच असतील. पण याचबरोबर लिंबाच्या सालांचे फायदे खूप कमी जणांना माहिती असतील. किचनची साफ-सफाई करण्यासाठी तुम्ही पण महागडे क्लीनर्स वापरता का? तर त्या ऐवजी लिंबाच्या सालांचा वापर करुन पाहा. (Kitchen Hacks In Marathi)
किचन हा घरातील सर्वात अविभाज्य घटक आहे. त्यामुळं तिथे डाग असण्याची शक्यता जास्त असू शकते. कारण किचनची स्वच्छता करणे खूप गरजेचे असते. त्यामुळं केमिकल असलेल्या प्रोडक्टपेक्षा नैसर्गिक क्लींजरचा वापर करणे चांगले मानले जाते. त्यामुळं किचनची साफ-सफाई करण्यासाठी लिंबाची साले एकदम परफेक्ट ऑप्शन आहे.
भांडी चमकवण्यासाठी
भांडी चमकवण्यासाठी लिंबाच्या सालाचा वापर तुम्ही करु शकता. करपलेली भांडी किंवा तेलाचे डाग काढायचे असेल तर ते लिंबाची साले त्या डागांवर घासा यामुळं आरामात ते डाग निघून जातील. त्याचबरोबर भांड्याना नैसर्गिकरित्या एक सुवासदेखील येईल.
आरशासारखे चमकेल लादी
केमिकल असलेले फर्श क्लीनर टाइल्सला नुकसान पोहोचू शकतो. अशावेळी लिंबाच्या सालांची पेस्ट लावून लादीवर जिथे डाग पडले आहेत तिथे लावून पाण्याने साफ करा. संगमरवरी आणि ग्रेनाइटच्या लाद्या साफ करण्यासाठी लिंबाची साले एकदम बेस्ट क्लिनिंग एजंट आहेत.
डस्टबिनमधूनही येणार नाही दुर्गंध
किचनमध्ये ठेवलेल्या डस्टबिनमधून खूपच दुर्गंध येत असेल तर लिंबाचे साल वापरून तुम्ही हा त्रास कमी करु शकता. यासाठी लिंबाची साले सुकवून ती कचऱ्याच्या डब्यात ठेवा किंवा मग लिंबाचा रसदेखील कचऱ्याच्या डब्यात शिंपडा यामुळंही दुर्गंधी कमी होईल.
मायक्रोव्हेव दिसेल नव्यासारखा
एका भांड्यात पाणी टाकून त्यात लिंबाची साले टाका. त्यानंतर हे भांडे मायक्रोव्हेवमध्ये काही वेळ ठेवा. यातून निघणाऱ्या वाफेमुळं आतील घाण थोडी मोकळी होईल. त्यानंतर ओल्या फडक्याने त्याची सफाई करुन घ्या.
मसाल्यांचे डब्बे साफ करा
किचनमध्ये ठेवलेल्या मसाल्यांच्या डब्यांवर दमट हवामानामुळं घाण साचते. अशावेळी खूप मेहनत करुन हे डाग काढावे लागतात. त्यासाठीच लिंबाची साले फायदेशीर ठरु शकतात. पहिल्यांदा डब्बे काही वेळ गरम पाण्यात ठेवा. मग डिश लिक्विडमध्ये भिजवून ठेवा. नंतर थोड्यावेळाने लिंबाच्या सालांनी घासून घ्या. डागांबरोबरच दुर्गंधीदेखील गायब होईल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)