Disadvantages of Keeping Fridge in Bedroom: जागेची कमतरता किंवा लाइफस्टाइल यामुळं अनेक गोष्टी बदलल्या आहेत. जागेच्या कमतरतेमुळं कधीकधी बेजरुमजवळ किंवा आत फ्रीज ठेवला जातो. पण बेडरुममध्ये फ्रीज ठेवणं खरंच सुरक्षित आहे का? या मुद्द्यावर आम्ही तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती देणार आहोत. यामुळं तुम्हीदेखील बेडरुममध्ये फ्रीज ठेवत असाल तर आत्ताच सावध व्हाल. जाणून घेऊया बेडरुममध्ये फ्रीज ठेवल्यामुळं काय परिणाम होतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बेडरुमच्या आत फ्रीज ठेवणे तुमच्यासाठी असुरक्षित ठरु शकते. कारण तज्ज्ञांच्या मते, फ्रीज बेडरुममध्ये ठेवल्याने गॅस गळती किंवा आग लागण्याच्या घटना घडू शकतात. मात्र, आजकाल फ्रीजमध्ये विविध सेफ्टी फिचर असतात त्यामुळं अशा घटना घडण्याची शक्यता खूपच कमी असते. तरीही सुरक्षिततेच्या दृष्टीने बेडरुममध्ये फ्रीज ठेवणे टाळावे. 


बेडरुममध्ये फ्रीज न ठेवण्याचे खरे कारण म्हणजे त्यातून निघणारी उष्णता. तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये फ्रीज ठेवल्यास, त्यातून निघणारी उष्णता तुमच्या बेडरूमचे तापमान वाढवू शकते. त्यामुळे तुम्हाला उष्णतेचा त्रास होऊ शकतो. यासोबतच खोलीत कार्बन डायऑक्साइड पसरण्याचा धोकाही हळूहळू वाढू शकतो.


रेफ्रिजरेटरचे (Effects of Fridge in Bedroom) मुख्य काम हे आपल्या घरातील कच्चे आणि शिजवलेले अन्न नेहमी ताजे आणि थंड ठेवणे हे आहे. हे कार्य पूर्ण करण्यासाठी, रेफ्रिजरेटर रात्रंदिवस चालू राहतो, ज्यामुळे त्यातून आवाज येत असतो. जर तुम्हाला कमी झोप येत असेल किंवा थोड्या आवाजामुळे जाग येण्याची समस्या असेल तर रेफ्रिजरेटरचा हा आवाज तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळं शक्यतो बेडरुममध्ये फ्रीज ठेवणे 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)