Nita Ambani Makeup Room: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी (Nita Ambani) यांनी नुकताच आपला डायमंड बर्थ डे साजरा केला. 1 नोव्हेंबरला नीता अंबानी यांनी वायची साठ वर्ष पूर्ण केली. पण या वयातही नीता अंबानी यांनी आपला फिटनेस आणि सौंदर्य जपलं आहे. त्यांच्या कपड्यांपासून ते त्यांच्या हेअरस्टाईलपर्यंत नेहमीच सोशल मीडियावर चर्चा होत असते. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी आपल्या कुटुंबासोबत मुंबईतल्य अँटिलिया (Antilia) या अलिशान निवासस्थानी राहातात. अँटालिया इमारत बाहेरुन कशी दिसते हे अनेकांनी पाहिलं आहे. पण अँटालिया आतून किती भव्य आहे हे जाणून घेण्यात लोकं उत्सुक असतात. अँटालियाच्या आतले फोटो क्वचितच पाहिला मिळालेत. पण आता नीता अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्ताने (Neeta Ambani Birthday) त्यांच्या अलिशान मेकअप रुमचे व्हिडिओ समोर आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलिशान मेकअप रुम
नीती अंबानी यांच्या वाढदिवसाच्या वेळचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ मेकअप आर्टिस्ट मिकी कॉन्ट्रॅक्टरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत नीता अंबानी यांच्या मेकअप रुमची झलक पाहिला मिळतेय. या व्हिडिओत एका टेबलवर वेगवेगळ्या महागड्या ब्रँड्सचे परफ्यूम, एक फोटो फ्रेम आणि मेकअपचं सामान ठेवलेलं दिसतंय. एक भला मोठा आरसा लावण्यात आलेला आहे. व्हिडिओत नीता अंबानी यांच्याबरोबर त्यांची सून राधिका मर्चेंटही दिसत आहे. राधिका मर्चंटने पिंक अँड रेड फ्लोरल स्मोक ड्रेस परिधान केला आहे. 


तर नीता अंबांनी यांनी गुलाबी रंगाची बनारसी साडी परिधान केली आहे. यात नीता अंबानी खूपच सुंदर दिसतायत. नीता अंबानी यांच्या महिला मदतनीसांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला. सर्व महिला कर्मचारी नीता अंबानी यांच्या पाया पडत त्यांना शुभेच्छा देताना दिसतायत. 



अंबानी यांनी निवासासाठी बांधलेली 27 मजली अँटालिया इमारत नेहमीच चर्चेत असते. या इमारतीची सुरक्षा भिंत, तिचे कोटीच्या घरातील वीज बील, नोकरांचा ताफा यामुळे वास्तुदोष यामुळे अँटालिया कायम चर्चेत राहिली आहे. मुकेश अंबानी यांचं हे निवासस्थान केवळ देशातलंच नाही तर जगातलं सर्वात महागडं निवासस्थान आहे. या इमारतीचा बांधकाम खर्च जवळपास 200 कोटी डॉलर म्हणजे भारतीय चलनात 12912 रुपये इतका आहे. या इमारतीत तीन हेलिपॅड आहेत. तसंच एक स्पेशल थिएटरसुद्धा आहे. या इमारतीचं क्षेत्रफळ जवळपास 4 लाख स्केअरफूट इतकं आहे. पहिले सहा मजले केवळ कार पार्किंगसाठी आहेत. अँटिलियात जवळपास 600 कर्मचारी काम करतात.