तीळ लावलेली एकदम पातळ व गोलाकार बाजरीची भाकरी कशी करावी? ही घ्या सोपी रेसिपी
Makar Sankranti 2024 : मकर संक्रतीच्या आधी भोगीचा दिवस साजरा केला जातो. त्यावेळी विशेषता लोक भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी घरी बनवतात. जर तुम्हाला ही तीळ लावलेली एकदम पातळ व गोलाकार बाजरीची भाकरी तयार करायची असेल तर पाहा रेसिपी...
Bhogi Special Bhakri recipe in marathi : मकर संक्रांतीच्या आधी म्हणजे भोगी हा सण असतो. भोगी या शब्दाचा अर्थ उपभोगणे किंवा खाणे असा होय. पौष हा थंडीचा महिना आहे. याच पार्श्वभूमीवर शेतात नवीन पिके भरपुर प्रमाणात तयार झालेली असतात. इंद्र देवाने धरतीवर उदंड पिके पिकावी म्हणून प्रार्थना केली होती म्हणून दरवर्षी पिके अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे. म्हणूच या दिवशी अनेकजण भोगीची मिक्स भाजी आणि तिळाची बाजरीची भाकरी बनवतात. भोगीच्या भाजी सोबत खाल्ली जाणारी ही बाजरीची भाकरी परफेक्ट बनवण्याचे एक कौशल्य आहे. ते जर अवगत झाले तर बाजरीची भाकर छान मऊ आणि टम्म फुगून तयार होतील. चला तर मग जाणून घेऊया रेसिपी...
बाजरीची भाकरी करण्यासाठी लागणारं साहित्य
बाजरीचं पीठ, तीळ, मीठ, पाणी
कृती
सर्वात आधी, परातीमध्ये ताज दळलेलं बाजरीचे वाटीभर पीठ घ्या. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मीठ घालू शकता, पण साधारणपणे बाजरीच्या पिठाला स्वतःची चव असते, त्यामुळे मीठ नाही घातले तरी चालते. नंतर आवश्यकतेनुसार थोडेसे पाणी घालून पीठ चांगले मळून घ्या. पीठ मऊ करण्यासाठी तुम्ही गरम पाण्याचा देखील वापर करु शकता.
त्यानंतर पीठ चांगले मळून झाल्यानंतर पीठाचा गोळा घ्या आणि हातावर थोडे सुके पीठ घ्या आणि बोटांच्या मदतीने पिठाच्या कड्यांना दाब देऊन गोलाकार आकार द्या. त्यानंतर परातीत थोडे सुके पीठ पसरवा. जेणेकरून गोळा थापताना परतीवर चिकटणार नाही. नंतर पिठाच्या मध्यभागी फुगलेला भाग हलक्या हाताने लाटण्यास सुरुवात करा. भाकरी थापताना गोल गोल फिरत राहिली. त्यामुळे त्यावर तीळ टाकायला विसरू नका. भाकरी थापून तयार करायला वेळ नसेल किंवा पाणी खूप घट्ट असेल तर हलकेच पाणी लावून फुगलेल्या बाजू सपाट करा.
दुसरीकडे लोखंडी तवा गरम करण्यासाठी ठेवा. गॅसची फ्लेम हाय ठेवा. तवा गरम झाल्यानंतर हलक्या हाताने भाकरी उचलून, पीठ लागलेली बाजू वर ठेवून भाकरी तव्यावर पसरून घाला. वरच्या बाजूला थोडे पाणी लावून दुसऱ्या बाजूला भाकरी पलटून घ्या.
लक्षात ठेवा पाणी लावल्यानंतर भाकरीची बाजू लगेच पलटावी, पाणी सुकून दिले तर भाकर एका बाजूला करपते आणि त्याचा पोत बिघडतो. दुसरी बाजू चांगली भाजल्यानंतर तिसऱ्यांदा भाकरी फुलून वर आली की समजावे की भोगी विशेष परफेक्ट बाजरीची भाकरी खाण्यासाठी तयार आहे.
मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीची भाजी आणि तीळ आणि बाजरीच्या सहाय्याने बनवलेल्या भोगीची भाजी आणि बाजरीचा आस्वाद घेतला जातो. भोगीच्या भाजीसोबत परफेक्ट बाजरीची भाकरी बनवण्याचे एक कौशल्य आहे. ते जर अवगत झाले तर बाजरीची भाकर छन मऊ आणि टम्म फुगुन तयार होतील.