उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. उष्माघाताने अनेकांना त्रास होत आहे. असं असताना स्वतःला उन्हापासून वाचवण्यासाठी अनेक जण वेगवेगळे पर्याय वापरतो. यामध्ये हायड्रेटिंग ड्रिंक्स म्हणून लिंबू पाणी, नारळ पाणी, ताज्या फळांचा ज्यूस आणि पाणी याचा वापर उन्हाळ्यात सर्वाधिक केला जातो. अशावेळी ऊन्हाचा रस हा उत्तम पर्याय असू शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहरात ताज्या ऊसाचा रस मिळणे अनेकदा कठीण होते. तसेच काही जणांना ऊसाचा रस पिणे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असते. यामध्ये मधुमेही किंवा एलर्जी असणाऱ्या लोकांचा समावेश असतो. अशावेळी ऊसाचा रस तुम्ही ऊस नसताना देखील तयार करु शकता. ही रेसिपी जाणून घ्या. 


ही रेसिपी शेफ नेहा दीपक शाहने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. याची सामुग्री जाणून घ्या. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by @nehadeepakshah


3 ते 4 मोठे गुळाचे तुकडे 
7 ते 8 फ्रेश पुदिन्याची पाने 
1 लिंबूचा रस 
बर्फाचे तुकडे 
स्वादानुसार सैंदव मीठ 


कसे तयार करा 


सगळ्यात अगोदर मिक्सरमध्ये बारिक कापलेला गुळाचा तुकडा घ्या 
यामध्ये पुदिन्याची पाने, लिंबाचा रस आणि बर्फ, सैंदव मीठ. 
यामध्ये एक ग्लास पाणी घालून सर्व सामुग्री मिक्स करा 
अतिशय स्वादिष्ट ऊसाचा रस तयार कराल 


ऊसाचा रस की गुळाचा रस, आरोग्यासाठी काय चांगल? 


ऊसापासूनच गुळ तयार केला जातो. पण आरोग्यासाठी ऊसाचा रस चांगला की गुळाचा रस चांगला हे समजून घेणे गरजेचे आहे. आहारतज्ज्ञ गरिमा गोयल यांनी सांगितले की, अशाप्रकारे घरी तयार केलेला गुळाचा रस शरीरासाठी फायदेशीर असते. ताज्या ऊसाचा रसामध्ये नैसर्गिक साखर असते. तसेच यामध्ये व्हिटॅमीन सी, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियमसह अनेक पोषकतत्व शरीराला मिळतात. यापासूनच गुळ तयार केला जातो. पोषकतज्ज्ञांच्यामते, ताज्या उसाच्या रसामध्ये फायबर असते. ते पचनासाठी अतिशय फायदेशीर आहे. तसेच ब्लड शुगरही कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. तसेच गुळामध्ये यापेक्षा कमी प्रमाणात फायबर असते. हे उसाच्या रसापेक्षा कमी फायदेशीर असते.