Overweight men: जास्त वजन असलेल्या व्यक्तींना शारिरीक व मानसिक दोन्ही प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांना हृदयाचे भयानक आजार, रक्तदाब, मधुमेह आणि हाडं दुखणे अशा अजून अनेक समस्या उद्भवतात. ज्या पुरुषांचं वजन खूप जास्त आहे त्याची मुले सुद्धा लठ्ठ होतील असे नाही. साओ पाओलो युनिव्हर्सिटीच्या रिबेरियो प्रेटो मेडिकलने केलेल्या एक संशोधनानुसार स्थुलता पुरुषांच्या स्पर्मच्या स्ट्रक्चर आणि डीएनएवर दुष्परिणाम करू शकते.


संशोधनात काय समोर आले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या संशोधनात 89 माता-पिता आणि त्यांचे नवजात बाळ यांची तपास केल्यावर उघड झालं की वडीलाच्या कंबरेचा आकार आणि BMI जेवढा जास्त असेल तेवढाच त्यांच्या मुलाच्या डोक्याचा घेर (Head circumference) लहान असेल. संशोधक डॉ. मारियाना रिनाल्डी कार्व्हालो म्हणाल्या, "गर्भाची वाढ आणि आईचे आरोग्य यांच्यातील संबंधांवर बरेच संशोधन झाले आहे, परंतु आमच्या संशोधनातून हे सिद्ध होते की पिताचं आरोग्य देखील जन्म घेणाऱ्या मुलासाठी परिणामकारक ठरते." पुढे डॉ. कार्व्हालो यांनी सांगितले की "आम्ही पहिलं संशोधन ब्राझीलच्या एका कुटुंबावर केलं. या संशोधनात पहायला मिळाले की वडीलाचं वजन जेवढं जास्त होतं तेवढंच नवजात बाळाचं वजन कमी होतं. कमी वजनाच्या लहान मुलांना नंतर टाईप 2 मधुमेह, कर्करोग आणि हृदयविकार होण्याचा धोका जास्त असतो."


हे ही वाचाः तुमच्या हेल्थ इन्श्यूरन्समध्ये HMPV व्हायरसचा इलाज होतो का? कोरोनावेळची ती चूक पुन्हा करु नका!


काय काळजी घ्यावी अधिक वजन असलेल्या पुरुषांनी?


गर्भधारणेपूर्वी वडिलांनी त्यांच्या आरोग्यासाठी संतुलित आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आहारामध्ये फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे, तसेच तळलेले, गोड आणि चरबीयुक्त पदार्थ टाळणे योग्य ठरेल. नियमित शारीरिक व्यायामाचाही आपल्या दिनचर्येत समावेश करा. आठवड्यात किमान 150 मिनिटे चालणे, धावणे किंवा योगासारख्या व्यायामाचा सराव केल्याने शरीर निरोगी राहते. वजन कमी करण्यासाठी कार्डिओ किंवा वेट ट्रेनिंगचा समावेश करणेही फायदेशीर ठरू शकते. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान, योग किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टींना प्राधान्य द्या. याशिवाय, धुम्रपान टाळणे आरोग्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. या सवयींचा अंगीकार केल्यास पित्यांना निरोगी आणि दीर्घायुष्यपूर्ण जीवन जगता येईल. आईसाठी पोषणविषयक काळजी घेणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे गर्भधारणेपूर्वी वडिलांची जीवनशैली बदलणेसुद्धा खूप आवश्यक आहे.