Badlapur Case : `या` लक्षणांवरुन ओळखा मुलांसोबत काही वाईट घडतंय का?
बदलापूर येथे 3 वर्षांच्या दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या प्रकरणाने आज बदलापूरमध्ये रेल्वे ठप्प करण्यात आली आहे. लैंगिक अत्याचार झालेल्या मुलांमध्ये शारीरिक-मानसिक बदल काय होतात? हे समजून घेणे गरजेचे आहे.
बदलापूरकरांना रस्त्यावर उतरायला भाग पाडणाऱ्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. 3 वर्षांच्या दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार घडला आहे. हा प्रकार बदलापूरमधील आदर्श शाळेत घडला असून 24 वर्षीय सफाई कर्मचाऱ्याला या प्रकरणात अटक केलं आहे. या प्रकरणात आता पालकांचा उद्रेक झाला आहे. बदलापूरमध्ये रास्ता रोको, रेल रोको करण्यात आली आहे. एवढंच नव्हे तर पोलिसांनी देखील सौम्य लाढीचार्च केला.
16 ऑगस्ट रोजी घडलेल्या या प्रकरणाचे पडसाद चार दिवसांनीही उमटत आहे. ही घटना पाहून अनेक पालकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. अशावेळी पालकांनी मुलांना Good Touch आणि Bad Touch बाबत माहिती देणे ही तेवढेच गरजेचे आहे. तसेच आपल्या मुलासोबत असा प्रकार घडला आणि त्याने ते सांगितलं नाही. तर पालकांनी ती परिस्थिती कशी ओळखावी?
कसा समजला हा प्रकार
एका मुलीने आपल्या पालकांना दादाने गुप्तांगाला स्पर्श केल्याचं सांगितलं. तेव्हा पालकांना याचा अंदाज आला. यानंतर त्यांनी आणखी एका विद्यार्थिनीच्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी देखील मुलीला याबाबत विचारणा केली असता तिने देखील ही गोष्ट मान्य केली. यानंतर तिची तपासणी करण्यात आली. यामध्ये हा प्रकार उघडकीस आला. लैंगिक अत्याचाराने मुलं कोमेजून जातं. त्यांच्यात अनेक प्रकार घडता. नकळत्या वयात असा आघात झाल्यामुळे त्यांचायात शारीरिक आणि मानसिक बदल घडतात. अशावेळी पालकांनी आपल्या मुलांसोबत काही वाईट घडलंय का? हे कसं ओळखाल.
मुलांवर होणारे परिणाम
लैंगिक अत्याचाराला बळी पडणाऱ्या मुलांवर दीर्घकाळ आणि अल्पकाळ अशा स्तरावर परिणाम होत असतात. या परिणामांमुळे मुलांची शारीरिक आणि मानसिक वाढ खुंटते. मुलांच्या दैनंदिन जीवनावर याचा परिणाम होतो. या परिणामांवरुन तुम्ही ओळखू शकता की, तुमच्या मुलांसोबत काही वाईट घडलंय?
अल्प काळातील लक्षणे
सतत आजारी पडणे, चिडचिड करणे
शाळेत अथवा जेथे हा प्रकार घडला आहे तेथे जाणे टाळणे
लक्षकेंद्रित करायला अडथळा निर्माण होते.
मूड स्विंग्स
एका क्षणात राग येणे अथवा एका क्षणात शांत होणे
झोप न लागणे, झोपेत घाबरुन उटणे
आत्मविश्वास गमावणे
स्वतःला त्रास करुन घेणे, आत्मविश्वास गमावणे
दीर्घकालीन बदलाची लक्षणे
आत्महत्येचा प्रयत्न करणे
घटनेनंतरही त्या आघातामध्ये राहणे
लैंगिक समस्या
नात्यात विश्वास निर्माण करण्यात अडथळा येणे
पालकत्व निभावताना सतत भीती वाटणे
रागावर नियंत्रण न राहणे