बहिण-भावाचं नातं हे अतिशय पवित्र असतं. बहिणीची रक्षा करणे हे भावाचं कर्तव्य मानलं जातं. तर भावाचा सन्मान करणे हे बहिणीचं आद्यकर्तव्य. रक्षाबंधनाच्या दिवशी हे नातं असंच फुलत राहावं यासाठी प्रार्थना केली जाते. असं कोणतं नातं नाही ज्यामध्ये दुरावा निर्माण झाला नाही. यामध्ये बहिण-भावाच्या नात्याचाही समावेश आहे. अशावेळी जर तुमचं बहिण-भावाचं नातं देखील दुरावलं असेल तर चाणक्य नीतिमध्ये सांगितलेल्या टिप्स महत्त्वाच्या ठरतात. 


मान-सन्मान 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार,भावा-बहिणीच्या नात्यामध्ये मान-सन्मान असणे अत्यंत गरजेचे असते. एकमेकांप्रती आदर असणं हे या नात्याचं गुपित आहे. जेव्हा नात्यातील ही गोष्ट कमी होत जाते तेव्हा मात्र दुरावा निर्माण होता. तसेच नात्यातील गोडवा देखील कमी होतो. 


विश्वासाची उणीव 


आचार्य चाणक्य आपल्या नीतिशास्त्रात सांगतात की, भावा-बहिणीचं नातं हे एक अतूट प्रेमाचं आणि विश्वासाचं नातं आहे. पण खोटेपणावर कधीच नातं टिकत नाही. म्हणून भावा-बहिणींचं नातं गरजेचं असतं कारण यामध्ये कुठेच खोटेपणा नसतो. खोटं बोलल्यामुळे नातं कमकुनत होतं आणि त्यामधील गोडवा नाहीसा होतो. 


प्रेमाशिवाय अर्थशून्य 


भावा-बहिणीच्या नात्यात जर दुरावा एकदा निर्माण झाला तर ती दरी भरून काढणे अतिशय कठीण असते. कारण एकमेकांबद्दल मतभेद निर्माण होणे किंवा मनात शंकेची पाल चुकचुकणे ही गोष्ट नात्यात अंतर निर्माण करण्यासाठी पुरेशी ठरते. कारण बहिण भावाचं नातं हे प्रत्येक नात्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण भाऊ हा एकाचवेळी वडिल, भाऊ अशी दुहेरी भूमिका बजावत असतो. तर बहिण देखील एकाचवेळी दोन भूमिका बजावत असते. 


पहिला आधार 


बहिण भावाचं नातं हे एक घट्ट नातं आहे. एकमेकांच्या संकट काळात दुसरं कुणीही धावत आलं नाही तरी बहिण-भावाचं हे नातं मात्र थोडं वेगळं असतं. कारण कोणत्याही कठिण काळात तुम्ही भावाने हक्काने बोलवू शकता. किंवा बहिणीची आधाराने सगळ्या गोष्टी शेअर केल्या जातात. 


रक्षाबंधन 


उद्या सगळीकडे रक्षाबंधनाचा दिवस साजरा केला जाणार आहे. अशावेळी अनेक भावंड एकमेकांपासून दूर असतील. अशावेळी जर तुमच्या नात्यातही असा दुरावा आला असेल तर आचार्य चाणक्य नीति यांच्या टिप्सनुसार तुम्ही नात्यामध्ये बदल करु शकता. 19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन हा सण साजरा केला जाणार आहे.